Tarun Bharat

इंडियन क्राफ्ट बाजारला बेळगावकरांचा वाढता प्रतिसाद

बेळगाव : येथील गोवावेस जवळील फायर ब्रिगेड ऑफिससमोर ओपन ग्राऊंडवर गेल्या 10 ऑक्टोबरपासून सुरू केलेल्या इंडियन क्राफ्ट बाजार प्रदर्शनाला बेळगावकरांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. दसरा-दिवाळी सणाचे औचित्य साधून सुरू केलेल्या या प्रदर्शनात एकाच छताखाली साठहून अधिक स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. त्यामध्ये भारताच्या विविध भागातील हॅन्डलूम व हॅन्डीक्राफ्ट उत्पादनांची मांडणी करण्यात आली आहे. त्यामध्ये लखनवी चिकन सुट, सहारनपूर फर्निचर, राजस्थानी बांगडय़ा, कार्पेट्स, राजस्थानी पेंटिंग्ज, सतरंजी, बनारसी, चंदेरी सिल्क साडय़ा, पश्चिम बंगालच्या साडय़ा, बेडकव्हर, दिवान सेट, केरळ ज्वेलरी, मोजडी, फॅन्स चप्पल, लेदर बॅग, टॉप्स, कॉटन शर्ट, टी-शर्ट, पंजाबी सूट, मंगलगिरी डेस मटेरियल, कॉटनच्या साडय़ा याबरोबरच भव्य अशा स्टॉल्सवर शोभेच्या वस्तू, वेगवेगळय़ा प्रकारच्या चिनी मातीच्या बरण्या, शोभेच्या वस्तू, फुलपात्रे आदी वस्तूंचा समावेश आहे.

प्रदर्शनात अनेक वस्तूंवर भव्य सवलत दिली जात आहे. तसेच पेडिट व डेबिट कार्ड्सवर खरेदी करणाऱयांना पाच टक्के सवलत दिली जात आहे. प्रदर्शनात सर्वांना मोफत प्रवेश असून पार्किंग सुविधा उपलब्ध आहे. हे प्रदर्शन आणखी थोडे दिवस असल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Stories

साईराज वॉरियर्स मराठा स्पोर्ट्स एसजे संघ पुढील फेरीत

Patil_p

समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्तीत गैरप्रकार

Amit Kulkarni

घरासमोर कार, हल्ले वारंवार

Amit Kulkarni

आश्रय योजनेतील घरांसाठी बँका करणार अर्थसाहाय्य

Amit Kulkarni

खानापूर नदीघाट पुलाच्या दुतर्फा जुन्या महामार्गाची दुरवस्था

Amit Kulkarni

ओलमणी येथे ऐन पावसाळय़ात पाणीटंचाई

Patil_p