Tarun Bharat

इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जिल्हा शाखेतर्फे रेडक्रॉस दिन साजरा

प्रतिनिधी / बेळगाव

इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे नुकताच रेडक्रॉस दिन साजरा करण्यात आला. बिम्स हॉस्पिटलच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात रेडक्रॉसचे संस्थापक जेन हेन्री डय़ूनंट यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. याचवेळी बिम्सच्या नूतन इमारतीमध्ये बांधकाम कामगार म्हणून काम करत असलेल्या सर्वांना मास्क आणि मिठाई वितरित करण्यात आली.

याप्रसंगी रेडक्रॉस शाखेचे सचिव डॉ. डी. एन. मिसाळे म्हणाले, सध्या सर्व जग कोरोनाशी लढत आहे. अनेकांच्या आशा हरपल्या आहेत. अशावेळी रेडक्रॉस ही संस्था मानवी समूहाला मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहिली आहे. रेडक्रॉसने अन्य संस्थांच्या सहकार्याने आजपर्यंत आपत्ती काळात प्रथमोपचार, रक्तदान व अन्य स्वरुपाचे मदतकार्य हाती घेतले आहे. याप्रसंगी चेअरमन अशोक बदामी, खजिनदार कर्नल विनोदिनी शर्मा, सदस्य सुमन हिरेमठ, प्रवीण हिरेमठ व अन्य उपस्थित होते.

Related Stories

सफाई कामगाराच्या उपस्थितीत गांधी जयंती

Amit Kulkarni

संभाव्य पूर परिस्थितीसाठी आपत्ती निवारण पथक सज्ज

Amit Kulkarni

असा आहे आपला वॉर्ड

Patil_p

बेळगाव-चोर्ला रस्त्याची होणार दुरुस्ती

Patil_p

काटगाळी प्राथमिक शाळेचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

Amit Kulkarni

कर्नाटकातील दहा जिल्ह्यांमध्ये कायम स्वरूपी आपत्ती केंद्रे स्थापन केली जाणार

Archana Banage