Tarun Bharat

 ‘इंडिया रँकिंग 2020’ चे रमेश पोखरियाल यांच्या हस्ते आभासी पद्धतीने प्रकाशन

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी पाच मापदंडाच्या विस्तृत श्रेणीतील कामगिरीच्या आधारे विविध श्रेणीतील उच्च शिक्षण संस्थाच्या ‘इंडिया रँकिंग 2020’ (भारत क्रमवारी 2020) चे प्रकाशन आभासी पद्धतीने केले. यावेळी मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे, राकेश रंजन, अनिल सहस्रबुद्धे, डॉ अनिल कुमार नासा आदी उपस्थित होते.


भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या इंडिया रँकिंगची ही सलग पाचवी आवृत्ती आहे. 2020 मध्ये नऊ क्रमवारीमध्ये पहिल्यांदाच ‘दंत’ या एका डोमेनचा समावेश करून पहिल्यांदाच एकूण 10 श्रेणी/विषय डोमेन सादर केले आहेत. 


पोखरीयाल म्हणाले की, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय संस्था क्रमवारी आराखडा (एसआयआरएफ) तयार करण्यासाठी हा महत्वाचा पुढाकार घेतला आहे, जो विविध श्रेणी आणि ज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये (डोमेन) उच्च शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीसाठी वापरला जात आहे आणि खरोखरंच आपल्या सर्वांसाठी हे प्रोत्साहनाचे स्रोत आहे.


पुढे ते म्हणाले की, या सरावामुळे संस्थांन डेटा व्यवस्थित एकत्रित करण्याची सवय देखील निर्माण झाली असून या सर्व संस्था बर्‍याच स्पर्धात्मक राहण्याचा  प्रयत्न करतात.


दरम्यान, इंडिया  रँकिंग 2020 साठी एकूण 3771 असाधारण संस्थांनी ‘समग्र’ श्रेणीनुसार आणि श्रेणी-विशिष्ट आणि- किंवा डोमेन-विशिष्ट क्रमवारीसाठी अर्ज सादर केले होते. एकूणच, क्रमवारीसाठी 5805 अर्ज या 3771 असाधारण संस्थांनी विविध श्रेणी-डोमेन अंतर्गत केले होते, ज्यामध्ये ज्यामध्ये 294 विद्यापीठे, 1071 अभियांत्रिकी संस्था, 630 व्यवस्थापन संस्था, 334 औषध शास्त्र संस्था, 97 कायदे संस्था, 118 वैद्यकीय संस्था, 48 वास्तुशास्त्र संस्था आणि 1659 सामान्य पदवी महाविद्यालयांचा समावेश आहे. 

Related Stories

धार्मिक स्थळे, रेस्टॉरंट, मॉल्स सुरू

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 1.15 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

योगी आदित्यनाथ विरोधातील याचिका फेटाळली

Patil_p

लेफ्ट. जन. राज शुक्ला युपीएससीचे सदस्य

Patil_p

ड्रग्जसाठी मला रियाचे फोन, मेसेज !

Patil_p

.डेल इंडियाचा व्यवसाय 64 टक्क्यांनी वधारला

Patil_p