Tarun Bharat

इंडिया लिजेंड्सला विजेतेपद

Advertisements

वृत्तसंस्था/ रायपूर

येथे झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज टी-20 स्पर्धेत इंडिया लिजेंड्स संघाने जेतेपद पटकावताना लंका लिजेंड्सचा 14 धावांनी पराभव केला. युसूफ पठाणला सामनावीर तर लंकेच्या तिलकरत्ने दिलशानला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.

या सामन्यात लंका लिजेंड्सने नाणेफेक जिंकून इंडिया लिजेंड्सला फलंदाजी दिली. इंडिया लिजेंड्सने युवराज सिंग (60) व युसूफ पठाण (नाबाद 62) यांची अर्धशतके व तेंडुलकरच्या 30 धावांच्या बळावर 20 षटकांत 4 बाद 181 धावा फटकावल्या. त्यानंतर लंका लिजेंड्सला 20 षटकांत 7 बाद 167 धावांवर रोखत विजयासह जेतेपदही पटकावले.

सेहवाग (10) व एस. बद्रिनाथ (7) लवकर बाद झाल्यानंतर सचिन तेंडुलकर व युवराज सिंग यांनी तिसऱया गडय़ासाठी 43 धावांची भर घातली. तेंडुलकरने 23 चेंडूत 30 धावा काढल्या. त्यानंतर युवराज-युसूफ यांनी चौथ्या गडय़ासाठी 47 चेंडूत 85 धावांची भर घातली. युवराजने 41 चेंडूंच्या खेळीत 4 चौकार, 4 षटकार ठोकले तर युसूफने 36 चेंडूत 4 चौकार, 5 षटकारांसह नाबाद 62 धावा झोडपल्या. इरफान पठाणने 3 चेंडूत एक षटकार मारत नाबाद 8 धावा केल्या. लंकेच्या रंगना हेराथ, जयसूर्या, फरवीझ माहरूफ, कौशल्या वीररत्ने यांनी एकेक बळी मिळविले.

दिलशान व जयसूर्या यांनी लंका लिजेंड्सला 62 धावांची सलामी दिली असली तरी नंतर त्यांचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले. दिलशानने 21, जयसूर्याने 43, चिंथाका जयसिंघेने 40, वीररत्नेने 15 चेंडूत 3 चौकार, 3 षटकारांसह 38 धावा फटकावल्या. इंडिया लिजेंड्सच्या युसूफ पठाण व इरफार पठाण यांनी प्रत्येकी 2 तर मनप्रीत गोनी व मुनाफ पटेल यांनी एकेक बळी मिळविला.

संक्षिप्त धावफलक ः इंडिया लिजेंड्स 20 षटकांत 4 बाद 181 ः सेहवाग 10, तेंडुलकर 23 चेंडूत 5 चौकारांसह 30, युवराज सिंग 41 चेंडूत 4 चौकार, 4 षटकारांसह 60, युसूफ पठाण 36 चेंडूत 4 चौकार, 5 षटकारांसह नाबाद 62, इरफान नाबाद 8, अवांतर 4, गोलंदाजी ः हेराथ 1-11, जयसूर्या 1-17, माहरूफ 1-16, वीररत्ने 1-23. लंका लिजेंड्स 20 षटकांत 7 बाद 167 (दिलशान 18 चेंडूत 21, जयसूर्या 35 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 43, थरंगा 13, जयसिंघे 30 चेंडूत 40, वीररत्ने 15 चेंडूत 3 चौकार, 3 षटकारांसह 38, अवांतर 9. गोलंदाजी ः युसूफ पठाण 2-26, इरफान पठाण 2-29, गोनी 1-24, मुनाफ पटेल 1-46.

Related Stories

“ज्यांनी जात काढली त्यांच्याच खांद्यावर राजू शेट्टींना अश्रू ढाळावे लागले”

Abhijeet Shinde

परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम ; जयंत पाटलांच्या हॉकी संघाला हटके शुभेच्छा!

Abhijeet Shinde

देशाला मिळाली तिसरी ‘वंदे भारत ट्रेन’

Abhijeet Shinde

सागर राणाच्या हत्याकांडात सुशील कुमारसोबत सहभागी असलेल्या चार जणांना बेड्या

Abhijeet Shinde

12 हजार शाळांचा निकाल 100 टक्के

datta jadhav

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी सदावर्तेंना जामीन मंजूर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!