Tarun Bharat

इंडी तालुक्मयातील अधिकाऱयांना शंकरगौडा पाटील यांचे मार्गदर्शन

प्रतिनिधी/ बेळगाव

मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील यांनी विजापूर जिल्हय़ातील इंडी तालुक्मयातील अधिकाऱयांची बैठक घेऊन कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत  सूचना केली. कोरोना विषाणू हा अत्यंत घातक आहे. लॉकडाऊन पुकारल्यानंतर सर्वसामान्य जनतेने दक्षता घेणे गरजेचे आहे. मात्र, अधिकाऱयांनीही त्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करावे, असे त्यांनी सांगितले. विजापूर जिल्हय़ामध्ये आतापर्यंत सर्व अधिकाऱयांनी कोरोनाबाबत दक्षता घेतली आहे, ही बाब चांगलीच आहे. मात्र, यापुढे अधिक सतर्क राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक गावामध्ये तसेच नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात औषधांची फवारणी करावी, याचबरोबर अधिक गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनीही दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

Related Stories

खानापुरात घरकुल योजनेला मंजुरी

Amit Kulkarni

बेळगाव शहरात 23 केंद्रांवर होणार उद्या टीईटी

Patil_p

स्कॉर्पिओची दुचाकीला धडक, दोघे गंभीर

Amit Kulkarni

शेषगिरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची अशोक आयर्न वर्क्सला भेट

Amit Kulkarni

कामगारांचा संप सुरूच, शहरात तीव्र पाणीटंचाई

Amit Kulkarni

ड्रेनेजवाहिन्या घालण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा विस्कळीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!