Tarun Bharat

इंदोरमध्ये बेजबाबदारपणाचा कळस

देशभरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सतर्कता बाळगली जात आहे. मध्यप्रदेशातही कोरोनाचा धोका वाढला असून इंदोरमध्ये सातत्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. याचदरम्यान शहरातून अत्यंत बेजबाबदार वृत्ती दर्शविणारा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा अनेक जीव धोक्यात आले आहेत. इंदोरच्या एमवाय रुग्णालयात कार्यरत दोन परिचारिका कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे दोघीही स्वतःचा अहवाल हाती लागेपर्यंत कार्यरत होत्या. तसेच त्यांनी एका गरोदर महिलेच्या शस्त्रक्रियेत भाग घेतला होता. या दोन्ही परिचारिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे संबंधित महिला तसेच नवजाताला संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाबाधित परिचारिका अन्य रुग्ण तसेच नवजाताच्याही संपर्कात आल्या होत्या. रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱयांना आता क्वारेंटाईन करण्यात आले आहे.

दोन्ही परिचारिकांना क्वारेंटाईन करण्याऐवजी कामाला जुंपण्यात आले होते. याप्रकरणी आता चौकशी सुरू करण्यात आल्याचे स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाने दिले आहे. काही दिवसांपूर्वी स्त्राrरोग विभागातील महिला डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते.

Related Stories

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ओम प्रकाश चौटाला दोषी; २६ मे रोजी शिक्षेची सुनावणी

Archana Banage

आरोपी शंकर मिश्राला जामीन

Patil_p

मंत्रिमंडळ विस्तार आज?

Patil_p

कोरोनाबळी घटल्याने दिलासा

Patil_p

भारतापेक्षा पाक, बांगलादेश अधिक आनंदी!

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 1,013 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar