Tarun Bharat

इंदोलीच्या पतसंस्थेत साडेचार कोटींचा गैरव्यवहार

चेअरमन निवास निकम यांच्यासह 33 जणांवर गुन्हा दाखल,

प्रतिनिधी/ सातारा

कराड तालुक्यातील इंदोली या गावातील ग्रामविकास ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आहे. त्या पतसंस्थेचे बेकायशीर कर्ज वाटप प्रकरणी चेअरमन निवास रामराव निकम याच्यासह 33 जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तब्बल पतसंस्थेत 4 कोटी 5 लाख 27 हजार 86 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी असून यामुळे जिह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याच बालेकिल्यात हा घोटाळा उघडकीस आल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती, उपलेखापरिक्षक रोहित सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इंदोली येथील ग्रामविकास ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था असून त्या पतसंस्थेचे चेअरमन निवासराव रामराव निकम, व्हाईस चेअरमन सुनील तानाजी निकम, संचालक रामराव दिनकर रावत, विठ्ठल शंकर निकम, नंदकुमार निवृत्ती शिंदे, बाबूराव बाळू निकम, वसंत तुकाराम चव्हाण, संतोष तानाजी चव्हाण, सुर्यकांत विठ्ठल घाडगे, महादेव अर्जून गायकवाड, किसन मारुती पवार, प्रशांत तुकाराम कोळपे, छाया तानाजी यादव, विठ्ठल निवृत्ती निकम, बाळू गणपती रावते, भानुदास शंकर निकम, उत्तम रंगा माने, चंद्रकांत शंकर चव्हाण, संपत पवार, गिता जयवंत गायकवाड, कल्पना चंद्रकांत नरोडे, अशोक दिनकर सपकाळ, व्हाईस चेअरमन बजरंग दिनकर गायकवाड, संचालक बाबासाहेब व्यंकटराव जाधव, सचिन संपतराव कदम, सुभाष भिकू निकम, सुर्यकांत बाबूराव केसेकर, भरत दादासो शिरसाठ, आवडाबाई विष्णू घाडगे, कलावती प्रभाकर शेटय़े, सुभद्रा बाबूराव वाघ, व्यवस्थापक रमेश गोपाळ पोरे यांनी 2002 ते 2018 या काळात पदावर असताना पदाचा गैरवापर करुन ठेवीदारांच्या निधीचा गैरवापर केला आहे.

सायफन ऑफ फंडचा घोटाळा केला आहे. पगार तारण कर्ज पोटनियमात नसताना तब्बल 2 कोटी 23 लाख 88 हजार 855 रुपये येणे दिसत आहे. तसेच पोटनियम बाह्य नरसिंह शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेल्या कर्जापैकी 1 कोटी 57 लाख 8 हजार 728 रुपये थकबाकी दाखवत आहे. तसेच कॅश क्रेडीट कर्जाची येणे बाकी 24 लाख 29 हजार 503 रुपयांची बाकी आहे, अशी 4 कोटी 5 लाख 27 हजार 86 रुपयांची कर्जे पोटनियम बाह्य कर्ज वाटप केलेली आहेत. कर्जाला तारण न घेणे, ज्या कारणासाठी कर्ज घेतले आहे. त्यासाठी विनीयोग न पाहणे, कर्ज व्यवहारामध्ये अनियमितता असणे, कर्ज थकीत असून वसुलीबाबत संस्थास्तरावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्याने सध्यास्थितीत संस्था डबघाईला आलेली आहे. त्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 नुसार सर्व संचालक मंडळ जबाबदार आहे. तसेच प्रमाणित लेखापरिक्षक सुनिल मारुती साबळे यांनी संस्थेचे दि. 1 एप्रिल 2017 ते दि. 31 एप्रिल 2018 या कालावधीत लेखा परिक्षण केले होते. त्यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 69(ग)(2) नुसार संस्थेचे खरे व वास्तव्य चित्र उघडकीस आणलेले नाही. वेळीच आवश्यक ती कार्यवाही केलेली नसल्याने तेही तितकेच जबाबदार आहेत. याचा तपास एपीआय अजय गोरड तपास करत आहेत.

माजी सहकारमंत्र्यांच्या बालेकिल्यातील प्रकार

पतसंस्था ही सहकाराची मंदेरे आहेत. याच मंदिरात जर सहकार मंदिराचेच सेवेकरी चुकीचे कृत्य करत असतील तर सहकाराचा मुलमंत्र देणाऱया त्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांना काय वाटत असेल, अशी प्रतिक्रिया अलिकडच्या काळात उमटू लागली आहे. माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून उंब्रजची ओळख आहे. त्यांच्याच बालेकिल्ल्यात व इंदोली या गावाचे नाव स्वातंत्र्य चळवळीशी जोडले गेले असून त्याच गावात असा प्रकार घडणे म्हणजे गावची अब्रु राज्याच्या वेशीवर टांगण्यासारखी आहे.

 चेअरमनकडून तब्बल सात वर्ष प्रकरण दडपण्याचा प्रकार

चेअरमन निवासराव निकम हे एका पक्षाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून कराड तालुक्यात चांगली पट्टी आहे. त्याच ओळखीच्या व राजकीय वरदहस्तांने त्यांनी दबाव टाकून हे प्रकरण मिटवण्यासाठी तब्बल सात वर्ष खटपट केली अखेर कोंबड कितीही कोंडल तरी सुर्य उगवल्यावर आरवायचं थांबत नाही असा प्रकार येथे घडला असून  सर्व 33 संशयितांना अटक करण्यात यावी, अशी मागणी ठेवीदारांच्यावतीने करण्यात आलेली आहे.

Related Stories

”पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय”

Archana Banage

दाऊदसंबंधी लोकांवर ईडीचे 10 ठिकाणी छापे

datta jadhav

साताऱ्यात 13 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

Archana Banage

दंड मागितल्याने दुचाकीस्वाराने अंगावर ओतून घेतले डिझेल

Patil_p

अन ‘त्या’ बंडखोर ३५ आमदारांचा फोटो समोर, मुख्यमंत्र्यांचं टेन्शन वाढलं

Rahul Gadkar

सातारा वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया जूनपासून

Patil_p
error: Content is protected !!