Tarun Bharat

इंदौरमध्ये ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण

ऑनलाईन टीम / भोपाळ : 

देशात एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना दुसरीकडे पोस्ट कोविड रुग्णांमध्ये आढळणाऱ्या ब्लॅक आणि व्हाईट फंगसने थैमान घातला आहे. त्यानंतर आता मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये ग्रीन फंगसचा पहिला रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या माणिक बाग रोडवर राहणाऱ्या विशाल श्रीधरला काही दिवसांपूर्वी कोरोना होता. बरे झाल्यानंतर तो घरी गेला, पण पोस्ट कोविड लक्षणांमुळे त्याला पुन्हा इंदौरमधील अरविंद रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याच्या फुफ्फुसांमध्ये आणि सायनसमध्ये एस्परगिलस फंगस आढळला, ज्याची ओळख ग्रीन फंगसम्हणून झाली. विशालला फुफ्फुसाचा 90 टक्के संसर्ग झाल्याने त्याला चार्टर्ड विमानाने मुंबईला पाठवण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

ग्रीन फंगस हा ब्लॅक आणि व्हाईट फंगसपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Related Stories

सौम्य संसर्गानंतर हयातभर अँटीबॉडी सुरक्षा

Patil_p

”लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, पण हातावर पोट असणाऱ्यांसाठी काही करावं लागेल”

Archana Banage

पदयात्रेतून पुष्कळ शिकावयास मिळाले !

Patil_p

…म्हणून भाजपने जारी केली प्रवक्त्यांसाठी नवीन नियमावली

Archana Banage

भाजपविरोधात उद्या ‘माफी मांगो’ आंदोलन

datta jadhav

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून

datta jadhav