Tarun Bharat

इंदौर : कोरोना पॉझिटिव्ह महिलेने दिला बाळाला जन्म, नाव ठेवले ‘सॅनिटायझर’

Advertisements

ऑनलाईन टीम / इंदौर : 


संपूर्ण देशात कोरोना संकट उभे ठाकले असताना मध्य प्रदेश मधील इंदौर शहरात सकारात्मक घटना घडली आहे. या शहरातील इंडेक्स मेडिकल कॉलेजमध्ये एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेने बाळाला जन्म दिला. या दोघांनाही नुकतेच घरी सोडण्यात आले आहे. मात्र, या महिलेने न खचता, कोरोनाशी केलेला संघर्ष कायम लक्षात रहावा यासाठी या महिलेने आपल्या मुलीचे नाव  ‘सॅनिटायझर’ असे ठेवले आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, इंदौर मध्ये राहणाऱ्या या महिलेचे नाव भारती असे आहे. त्यांच्या घरातील सर्वानाच कोरोनाची बाधा झाली होती. त्यातच भारती यांच्या सासऱ्यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला.  त्यामुळे साहजिकच चिंता वाढली. सर्व सदस्य क्वारंटाइन असताना भारती यांना नववा महीना लागला होता. त्यांना शहरातील इंडेक्स मेडिकल कॉलेज मध्ये दाखल करण्यात आले. त्यांची व्यवस्थित काळजी घेतली. मात्र भारती यांना भीती होती की आपल्या बाळाला कोरोनाची लागण होईल. मात्र, जन्मानंतर बाळाची कोरोना टेस्ट केली असता, रिपोर्ट निगेटिव्ह आले व सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. 

दरम्यान, भारती यांनी आपल्या मुलीचे नाव  ‘सॅनिटायझर’ ठेवण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला कुटुंबातून विरोध झाला पण भारती यांच्या हट्टापुढे सर्व नमते झाले. तसेच मुलीच्या येण्याच्या खुशी सोबतच अजून एका गोष्टीने सर्व कुटुंब आनंदी आहे, कारण भारती यांच्या कुटुंबातील सर्वजण आता कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना आता जीवन जगण्यास नवी उमेद मिळाली आहे. 

Related Stories

काँग्रेस नेतृत्त्वाची आज ‘पराभव’मंथन बैठक

Patil_p

‘मला अपमानित झाल्यासारखं वाटतंय’; राजीनाम्यानंतर अमरिंदर सिंगांची प्रतिक्रिया

Archana Banage

दिल्लीत 24 तासात 356 नवे कोरोना रुग्ण

prashant_c

कोरोनाचा औषधांच्या किमतींवरही पडतोय प्रभाव

Patil_p

किम जोंग यांची प्रकृती गंभीर?

Patil_p

जम्मू-काश्मीर परिसीमन : सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

Patil_p
error: Content is protected !!