Tarun Bharat

इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसची निदर्शने

Advertisements

इंधनच्या किंमती कमी करण्याची मागणी / केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

प्रतिनिधी / पणजी

गोवा प्रदेश काँग्रेस समिती, युवक व महिला काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने महागाई विरोधात पणजीत मोर्चा काढून धरणे करण्यात आली. त्यावेळी राज्यातील, केंद्रातील भाजप सरकारचा जोरदार निषेध नोंदविण्यात आला. पणजीतील काँग्रेस भवनाकडून हा मोर्चा सुरु झाला व आझाद मैदानाला वळसा घालून तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला.

यावेळी बोलताना अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, पेट्रोल – डिझेल या इंधन दरवाढीतून केंद्र सरकारने रु. 2 लाख कोंटीची कमाई केली असून सर्वसामान्य जनतेला त्रासात टाकून वेठीस धरले आहे. मे – जून महिन्यापासून आतापर्यंत 43 वेळा इंधन दरवाढ झाली असून त्याचा सर्वसामान्य माणसाला मोठा जबर फटका बसला आहे. दोन्ही इंधनाच्या किंमती रु. 35 ते 40 प्रती लिटर दरम्यान खाली आणण्याची मागणी त्यांनी केली.

त्यावेळी आल्तिनो गोम्स, महिला काँग्रेस अध्यक्ष बीना नाईक, युवक काँग्रेस अध्य़क्ष वरद म्हार्दोळकर व माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांची भाषणे झाली. काँग्रेस पक्षातर्फे देशभर महागाई विरोधात आंदोलने करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून हा मोर्चा काढण्यात आला. पेट्रोल – डिझेल तसेच गॅस दरवाढीने जनता त्रस्त झाली असून दरवाढ दाखवणारे फलक मोर्चेकऱयांच्या हातात होते. राज्य – केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी बँडबाजा व इतर वाद्यांचा वापर करण्यात येऊन मोदी सरकार नको म्हणून नारेबाजी झाली. पोलिसांनी त्यावेळी कडक बंदोबस्त ठेवला होता.

Related Stories

पालकांकडून शाळांनी हमीपत्रे घेऊ नये

Amit Kulkarni

मुरगांव भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी छाया होन्नावरकर

Amit Kulkarni

मोखर्ड येथील अश्वत्थ नारायण देवालय शिमगोत्सवाला प्रारंभ

Amit Kulkarni

एमबीए, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजना

Amit Kulkarni

कोरोनाचा 1 बळी तर 112 नवे रुग्ण

Patil_p

24 तासांत विनापरवाना होर्डिंग्स, बॅनर्स स्वतःहून हटवा : मुख्याधिकारी

Amit Kulkarni
error: Content is protected !!