Tarun Bharat

इंधन दरवाढी विरोधात तिसंगीत कोल्हापूर यूवक काँग्रेसचे आंदोलन

वार्ताहर / साळवण

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात तिसंगी (ता.गगनबावडा) येथील केदार पेट्रोल पंप येथे मोदी सरकार विरोधात कोल्हापूर यूवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष बयाजी शेळके यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर यूवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनातून पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने आली. केंद्र सरकार दरवाढीच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्य जनतेची गळचेपी करत असल्याचे मत यूवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ते बयाजी शेळके यावेळी बोलताना व्यक्त केले. या आंदोलनात चले जाव चले जाव मोदी सरकार चले जाव च्या घोषणा देत मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

या आंदोलनामध्ये जि.प.सदस्य भगवान पाटील, उपसभापती पांडूरंग भोसले, करवीर विधान उपाध्यक्ष संदीप पाटील, युवक सरचिटणीस सुर्यकांत पडवळ, माजी सरपंच सहदेव कांबळे,दादू पाटील, सोशल मिडीया प्रमूख संभाजी पाटील, पांडूरंग खाडे,दगडू जाधव बाबासो भोसले, आदर्श कोटकर,नंदकुमार पाटील, प्रकाश सूतार, संभाजी पाटील(निवडे) विनायक पाटील,अमित पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

शासकिय पाणी पुरवठा योजनेतील पाण्याची तपासणी करा

Archana Banage

ओबीसींच्या माहिती संकलनात व्यवस्थित नोंदी करा

Archana Banage

कोल्हापूर : नॉन कोविड रूग्णांचा जीव टांगणीला!

Archana Banage

इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात कोल्हापूरच्या रोबोची भारी चर्चा, देशविदेशातून मागणी

Archana Banage

वेदगंगा नदीकाठच्या शेकडो विद्युत मोटारी पाण्यात बुडल्या

Archana Banage

खोक्याबरोबर खेळायची आदित्य ठाकरेंना लहानपणापासून सवय-दीपक केसरकर

Archana Banage