Tarun Bharat

इंधन दरात सुसाट वाढ

पेट्रोलनंतर आता डिझेलची शंभरीकडे वाटचाल

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशातील पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती थांबायचे काही नाव घेत नाहीत. रविवारी सलग दुसऱया दिवशी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याचे दिसून आले. मुंबईत रविवारी पेट्रोलची किंमत 34 पैशांनी वाढली असून डिझेल प्रतिलिटर 26 पैशांनी महागले. मुंबईमध्ये रविवारी पेट्रोलचा दर हा 104.56 रुपये असून डिझेलचा दर हा 96.42 रुपये इतका आहे. गेल्या काही दिवसात इंधनदरात होत असलेली वाढ पाहता आता नजिकच्या काळात पेट्रोलपाठोपाठ डिझेलचे दरही शंभरीचा आकडा पार करतील, अशी चिन्हे दिसत आहेत.

मे महिन्याच्या प्रारंभी पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर इंधन दराच्या किंमती वाढायला सुरुवात झाली. 4 मेपासून 27 जूनपर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 31 वेळा वाढ झाली आहे. भोपाळमध्ये देशातील सर्वाधिक दराने पेट्रोलची विक्री होते. भोपाळमध्ये पेट्रोलचा दर हा 106.71 रुपये असून डिझेलचा दर हा 97.63 रुपये इतका आहे. महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती नियंत्रणात असतानाही भारतात इंधनाच्या दरात वाढ होत आहे. सातत्याने वाढत चाललेल्या इंधन दरांमुळे वाहनधारकांच्या खिशांवर अतिरिक्त ताण पडत आहे.

Related Stories

शेतकऱयांच्या मदतीसाठी सरकारचा पुढाकार

Patil_p

मणिपूरमध्ये आर्मी कॅम्पवर भूस्खलन

Amit Kulkarni

कुलगाम चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

बिहारमध्ये गंगा नदीत बोटीत सिलिंडरचा स्फोट

Patil_p

पंजाब : 2,490 नवे कोरोना रुग्ण ; 38 मृत्यू

Tousif Mujawar

शेअरबाजारातील अस्थिरता नियंत्रणात

Patil_p