Tarun Bharat

इचलकरंजातील स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंचे उज्ज्वल यश

बेळगाव  : इचलकरंजी येथे झालेल्या खुल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत पीरनवाडी व धामणे येथील शुटोकॉन स्पोर्ट्स अकादमीच्या 16 कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले.

इचलकरंजीतील अल्फान्स स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या खुल्या कराटे स्पर्धेत 540 स्पर्धकांनी भाग घेतला होता. बेळगावच्या शुटोकॉन कराटे स्पोर्ट्सच्या रत्नश्री सतीश पाटील, सोनाली वेंकटेश पाटील, रोहन श्रीराम पवार, प्रणव परशराम बिरगौडा, विराट राजु कदम व वैभवी वेंकटेश पाटील यांनी विविध गटात प्रथम क्रमांक पटकाविला.

हर्षल सतीश बेळगावकर, सुरज बसवंत कुगजी, प्रणव परशराम बीरगौडा, प्रीतम परशराम बिरगौडा, रितेश महादेव पाटील, निशांत अशोक गावडे, रूद्राक्ष लक्ष्मण कार्वेकर, ऋतुराज विनायक बाबले, नागेश अप्पुनी राऊत, पृथ्वी ब्रम्हकुमार, ऋषभ पाटील यांनी द्वितीय क्रमांक तर निशिगंधाने तृतीय क्रमांक पटकाविला. वरील सर्व कराटेपटूंना शुटोकॉन कराटे स्पोर्ट्स अकादमीचे प्रशिक्षक चंदन जोशी, जयराज जोशी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Related Stories

व्ही. एम. शानभाग स्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश

Patil_p

नवीन रेशनकार्डच्या कामाला सुरुवात कधी?

Patil_p

कलारकोप्प येथे बसवेश्वर मंदिरात चोरी

Amit Kulkarni

इमारत बांधकाम परवाना प्रक्रिया रखडली

Omkar B

अलायन्स एअरची पुणे-बेंगळूर सेवा 27 पासून होणार पूर्ववत

Patil_p

आरएलएस कायदा महाविद्यालयात कनकदास जयंती साजरी

Amit Kulkarni