Tarun Bharat

इचलकरंजीच्या दौऱ्यावर दोन गवे

प्रतिनिधी / इचलकरंजी

शहरालगत असणाऱ्या नाईक मळा, हेरलगे मळा आणि शाहूनगर परिसर रविवारी सांयकाळी दोन गव्याचे दर्शन झाले. याबाबतची माहिती नगरसेवक राजवर्धन नाईक यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्याच्या बरोबर संपर्क त्यांना दिली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यानी या परिसरातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

कोल्हापूर आणि किणी (हातकणंगले) नंतर दोन गवे रविवारी सांयकाळी इचलकरंजीच्या दौऱ्यावर आले आहेत. हे सायंकाळी शेतातील काम आटोपून घरी परतत असलेल्या शहरालगतच्या नाईक मळा, हेरलगे मळा आणि शाहूनगर परिसरातील शेतकऱ्यांना झाले. यांची माहिती शेतकऱ्यांनी नगरसेवक राजवर्धन नाईक यांना दिली. त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्याच्या बरोबर संपर्क साधून इचलकरंजी शहरालगतच्या मळे भागात दोन गवे आल्याची दिली.

त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यानी गव्यांचा भ्रमण काळ असल्याने ते एका ठिकाणी थांबत नाही. शेतकऱ्यांनी शेतात जाताना न घाबरता दोनहून अधिक शेतकऱ्यांनी एकत्रीत हातात काठी आणि रात्रीवेळी बॅटरी घेऊन जावे. गवे निघून जात असल्याने त्यांना हुसकावून लावू नये. ते बिथरण्याची शक्यता असल्याने सतर्क रहावे असे आवाहन केले आहे.

Related Stories

इचलकरंजी येथे अल्पवयीन युवतीची छेड काडणाऱ्या एकास अटक

Archana Banage

गावातील व्यक्ती होऊ शकते ग्रामपंचायतीवर प्रशासक

Archana Banage

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा संचालकपदी अजितसिंह जाधव

Archana Banage

महाविकास आघाडीच्या निषेधार्थ कोल्हापुरात भाजप रस्त्यावर

Archana Banage

टेंम्पोच्या धडकेत सोनगेतील तरुण ठार

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : गडमुडशिंगी येथे एकाचा संशयास्पद मृत्यू ?

Archana Banage