Tarun Bharat

इचलकरंजीतील एसटी कर्मचाऱ्याचा मुंबईत मृत्यू

प्रतिनिधी/इचलकरंजी

मुंबईतील परळ एसटी आगारापासून अवघ्या शंभर फुटावर इचलकरंजीतील एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यदेह पोलिसांना शुक्रवारी रात्री आढळून आला. महेश सुरेश लोले (रा. वेताळ पेठ, इचलकरंजी) असे त्यांचे नाव आहे. तो कागल एसटी आगारामध्ये एसटी वाहक म्हणून काम करीत होता. या घटनेची माहिती समजताच त्यांचे नातेवाईक रात्रीच मुंबईला रवाना झाले आहेत. लोले यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गेल्या सहा महिन्यापासून एसटी कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्याकरीता संपूर्ण राज्यात काम बंद आंदोलन सुरु केले होते. याच दरम्यान एसटी कर्मचारी संघटनाकडून दाखल याचिकेचा निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने कामावर परतणार्या संपकारी कर्मचार्यांवर कारवाई करु नये. पूर्वी केलेली कारवाई, कारणे दाखवा नोटीसा रद्द कराव्या. संप काळातील बदल्या रद्द करुन पूर्वीच्या ठिकाणी नेकणूक द्यावी. निवृत्त कर्मचार्यांना थकीत पीएफ निर्धारीत मुदतीत अदा करावा. कोरोनाने मृत कर्मचार्यांच्या कुटुंबियांना चार आठवडय़ात भरपाई द्यावी, असे म्हटले आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर सहा महिन्यापासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करीत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आंनदोत्सव साजरा केला होता. या आनंदोत्सवाला काही तासाचा कालावधी लोटतो ना लोटतो. तोपर्यंत शुक्रवारी दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

याचदरम्यान पोलिसांना शुक्रवारी रात्री दादर (मुंबई) पोलिसांना परळ (मुंबई) एसटी आगारापासून अवघ्या शंभर फुटावर असलेल्या सारथी बीअर बार नजीक एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यदेह मिळून आला. दादर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता मृत एसटी कर्मचारी महेश सुरेश लोले (रा. मंगळवार पेठ, इचलकरंजी) हा असून, तो कागल एसटी आगारामध्ये एसटी वाहक म्हणून काम रीत असल्याचे समजून आले. त्यावरुन पोलिसांनी इचलकरंजी पोलिसांच्याबरोबर इचलकरंजी आणि कागल एसटी आगाराच्या प्रमुखांच्याबरोबर संपर्क साधला. त्यांना घडल्या घटनेची माहिती दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात पाठविला. एसटीच्या व पोलीस कर्मचाऱ्यांनी मृत महेश लोलेच्या घरच्याशी संपर्क साधला. त्यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यावरुन लोलेचे नातेवाईक शुक्रवारी रात्रीच मुंबईला रवाना झाले आहेत.

Related Stories

बलात्कार आणि छेड काढणाऱ्या आरोपींबाबत योगी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Tousif Mujawar

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यात कोरोनाग्रस्तांची शंभरी पार

Archana Banage

कोल्हापूर : क्लस्टर पध्दतीच्या परीक्षा गुरूवारपासून घ्या

Archana Banage

गडचिरोलीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये टॉप माओवादी कमांडर मिलिंदचा समावेश

Archana Banage

ज्येष्ठ नेते शरद पवार शनिवारी कोल्हापुरात

Archana Banage

विधानपरिषदेसाठीही सेनेकडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी, ‘ही’ दोन नावे चर्चेत

datta jadhav