Tarun Bharat

इचलकरंजीत बीअर बारवर छापा ; मालकासह दोघांना अटक

Advertisements

44 हजार 519 रुपये किंमतीची देशी, विदेशी दारुसह बीअर जप्त

इचलकरंजी / प्रतिनिधी:


संचार बंदीचे उल्लंघन करीत दारुची चोरुन विक्री करणाऱ्या शहरातील कोल्हापूर रोडवरील हॉटेल उपवन बीअर बार अँड परमिट रूमवर पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकला. बार मालकासह बार मॅनेजरला अटक केली. त्यांच्याकडून 44 हजार 519 रुपये किंमतीची देशी, विदेशी दारुसह बीअर जप्त केली. ही कारवाई पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या विशेष पथकाने केली.


हॉटेल उपवन बीअर बार अँड परमिट रुममधून संचार बंदीचे उल्लंघन करुन, अवैधपणे विदेशी दारुसह बीअरची विक्री केली जात आहे. यांची माहिती पोलीस उपाअधीक्षक महामुनी यांना बातमीदाराकडून समजली. त्यांनी यांची माहिती कार्यालयाच्या विशेष पथकातील कॉन्स्टेबल सुनील पाटील , सागर हारुगले आदीनी या हॉटेलवर छापा टाकला. यावेळी या पथकाला अवैधपणे दारुची विक्री करीत असलेले मालक अश्विनसुंदर शेट्टी ( वय 43, रा. यशोलक्ष्मी मंगल कार्यालयानजीक, कबनूर, ता. हातकणंगले), हॉटेल मॅनेजर संजयगणपती शिंदे ( वय 48, रा. शाहुनगर, चंदूर, ता. हातकणंगले) हे दोघे मिळून आले. त्यांच्याकडून 44 हजार 519 रुपये किंमतीची विदेशी दारुसह बीअर जप्त केली. यांची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे.

Related Stories

लोकमान्यांनी भेट दिलेले `गीतारहस्य’ मिरजेत

Abhijeet Shinde

एसटी बस थांबवली नाही म्हणून वाहकाला बेदम मारहाण

Abhijeet Shinde

आणाजे येथे भिंत कोसळून एकाचा मृत्यू

Sumit Tambekar

एकरकमी एफआरपीसह १४ टक्के वाढ घेणारच

Abhijeet Shinde

पुराच्या पाण्यातून जीवघेणी वाहतूक, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा धोकादायक प्रवास

datta jadhav

`’कपिलतीर्थ’ जवळील जागेत होणार अन्नछत्र

Abhijeet Shinde
error: Content is protected !!