प्रतिनिधी / इचलकरंजी
शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहर स नियंत्रण समिती, पोलिस प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत शहरात ७२ तासांचा कडक लॉकडाउन करण्यावर एकमत झाले आहे. यामुळे कोरोना संसर्ग साखळी तोडण्यास मदत होईल असे मत नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी व्यक्त केले. या लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवेवरही काही प्रमाणात निर्बंध घालण्यात येणार आहेत. पोलीस व सनियंत्रण समिती मध्ये चर्चा होऊन या लॉकडाउन संदर्भातील आचार संहिता ठरवण्यात येणार आहे.


previous post