Tarun Bharat

इचलकरंजी आगारात अज्ञातांकडून १३ वाहनांची तोडफोड

आगाराच्या सुरक्षा रक्षकासह एक कर्मचारी आणि चालकावर खूनी हल्ला

इचलकरंजी/प्रतिनिधी

शहरालगच्या शहापूर येथील राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आगारामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास सात ते आठ जणाच्या अज्ञात टोळीने दहशत निर्माण करीत, आगरामध्ये प्रवेश केला. आगाराच्या सुरक्षा रक्षकासह एक कर्मचारी आणि चालकावर खूनी हल्ला करीत, उभ्या केलेल्या आठ एसटीच्या आणि पाच टू व्हीलर अशा तेरा वाहनाची तोडफोड केली. सर्व जखमीना उपचारासाठी शहरातील एका रुग्णालयात दाखल केले आहे. यामध्ये सुरक्षा रक्षकासह दोन एसटी चालक गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार नेमका कोणी केला. याबाबत मात्र अद्यापही कारण स्पष्ट झाले नाही. मात्र दोन दिवसापूर्वी शहरात झालेल्या अपघाताच्या कारणातून झाला असावा, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे, अशी माहिती शहापुर पोलिसांनी दिली.

 इचलकरंजी आगाराचे शहापूर या ठिकाणी बस डेपो आहे .याठिकाणी सर्व बस गाड्या लावल्या जातात. मध्यरात्रीनंतर अज्ञात सात ते आठ जणाची टोळी याठिकाणी आली. त्यानी प्रथम आगारच्या गेटवरून उड्या मारुन प्रवेश केला. सुरक्षारक्षकास बेदम मारहाण केली. त्यानंतर एसटी डेपो मध्ये प्रवेश करत आठ ते नऊ गाड्यांची प्रचंड नासधूस केली. त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेल्या दोन कर्मचार्‍यांना तसेच वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची या जमावाने बेदम मारहाण झाली केली. हा प्रकार नेमका कोणी केला याबाबत तपास सुरू आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी येथील  बस आणि दुचाकीचा अपघात झाला होता. यामध्ये दुचाकीस्वार वरील तिघे जण गंभीर जखमी झाले होते. या तिघांना कोल्हापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले होते. यातील एकाचे काल निधन झाले. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या घटनेशी संबंधित हल्लेखोर आहेत का याचा तपास सुरू केला आहे.

दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी रात्री एकत्र येऊन दहशत करणाऱ्यांना एक जणास पकडून पोलिसांच्या दिले स्वाधीन केले. या घटनेने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे

Related Stories

इचलकरंजीत दुचाकीची चोरी, मोबाईल स्नॅचिंग करणारे त्रिकूट अटकेत

Archana Banage

जबरी चोरीतील आरोपीस पाठलाग करुन जेरबंद

Abhijeet Khandekar

राधानगरी तालुक्यातील ११ हजार ७०६ शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान मंजूर

Archana Banage

यंदाही होणार नाही अमरनाथ यात्रा

Patil_p

उत्तरप्रदेशात लोकसंख्या नियंत्रणाचा मसुदा तयार

Patil_p

नारायण राणेंना अटक?; पोलिसांचं पथक चिपळूणला रवाना

Archana Banage