Tarun Bharat

‘इचलकरंजी’ नंतरही दूधगंगेत अर्धा टीएमसी पाणी

प्रतिनिधी / कोल्हापूर

इचलकरंजी शहरासाठीची दूधगंगा नदीवरील सुळकुड योजना कार्यान्वित झाली तरीही पिण्यासाठी राखीव असलेले अर्धा टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. त्यामुळे इचलकरंजी पाणी योजना होण्यास काहीच अडचण नाही. पुरेसा पाणीसाठा आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाच्यावतीने मंगळवारी देण्यात आली. खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजी योजनेचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर येथील शासकिय विश्रामगृह येथे बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत पाटबंधारे उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता रोहीत बांदिवडेकर यांनी ही माहिती दिली. सर्वांचा गैरसमज दूर करुन योजना निश्चितपणे कार्यान्वित होईल, असा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला.
 
बैठकीस नगराध्यक्षा ऍड. अलका स्वामी, पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे, नगरसेवक उदयसिंह पाटील, मदन कारंडे, रविंद्र माने, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, माजी नगरसेवक महादेव गौड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नितीन कोकणे, वस्रोउदयोग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी जलअभियंता बापुसो चौधरी, जीवनप्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता डी. के. महाजन, पाटबंधारे दक्षिणच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने आदी प्रमुख उपस्थित होते.

आढावा बैठकीत कार्यकारी अभियंता यांनी सिंचन, पिण्याचे आणि उद्योगासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या पाणीसाठय़ाची वस्तूस्थिती मांडली. ते म्हणाले, दूधगंगा प्रकल्पात २३. ९९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यापैकी पिण्यासाठी ५.१५ टीएमसी, उद्योगासाठी ०.४४ टीएमसी असे एकुण ६.३९ टीएमसी बिगर सिंचनाचे आरक्षण आहे. पिण्यासाठी १५ टक्के प्रमाणे ३.६० टीएमसी आरक्षण आहे. तर प्रकल्पीय तरतुदीच्या १० टक्के म्हणजे २. ४० टीएमसी औद्योगिक आरक्षण आहे. पिण्याच्या पाण्याचा विचार केल्यास ५.९५ टीएमसी मधील ३.७१० टीएमसी पाणी सध्या उचलण्यात येते आहे. भविष्यात ०. ९०४ टीएमसी पाणी पिण्यासाठी मागणी होण्याची शक्यता गृहीत धरली तरी प्रकल्पात अर्धा टीएमसी पिण्यासाठीचे पाणी शिल्लक राहणार नाही. औद्योगिक आणि शेतीच्या सिंचनाचेही पाणी पूर्ण उचलले जात नाही. कर्नाटकला ४ टीएमसी पाणी देवूनही शिरोळला सिंचनासाठी पुरेसे पाणी दिले जाते. असे बांदिवडेकर यांनी सांगितले. सर्व विभागाच्या एकत्रित मान्यतेनंतर योजनेला मंजुरी मिळाली आहे. योजनेचे काम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करावा. ३१ जुलैपूर्वी जीवन प्राधिकरणाने अहवाल सादर करावा अशी सूचना खासदार माने यांनी केली.

Related Stories

माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यातील १०० केंद्रांवर लसीचा तुटवडा

Archana Banage

सिंधुताईंचा कोल्हापूरशी साडेतीन दशकाचा स्नेह ! : माजी महापौर भिकशेठ पाटील यांनी केले होते सहाय्य

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यात दहा दिवसाचा ‘जनता कर्फ्यू’

Archana Banage

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी 20 कोटींचा निधी

Archana Banage

युवासेनेचे कुरुंदवाड आगारास बससेवा सुरु करण्याचे निवेदन

Archana Banage