Tarun Bharat

इचलकरंजी नगरपालिकेत युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Advertisements

इचलकरंजी / प्रतिनिधी

दिलेल्या तक्रारीकडे नगरपालिकेने साफ दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ इचलकरंजी शहरातील एका युवकाने गुरुवारी दुपारी नगरपालिकेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पण नगरपालिका कर्मचारी आणि पोलिसांनी वेळीच त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडीत, त्याला ताब्यात घेतले. या प्रकाराने नगरपालिकेत काही काळ गोंधळ उडाला होता.

इचलकरंजी शहरातील बीजेपी मार्केट परिसरात राहणाऱ्या जाजू नामक युवकाने वडील आणि त्यांच्या मित्रांनी संगणमत करुन बेकायदेशीर बांधकाम केले आहे. त्या बाधकामाविरोधी कारवाई करावी, अशा तक्रार केली होती. या तक्रारीला आठ महिन्यांचा कालावधी लोटला. तरी देखील नगरपालिका प्रशासनाने त्या तक्रारीकडे साफ दुर्लक्ष केले. याचा जाब विचारण्यासाठी तो गुरुवारी दुपारी नगरपालिकेत आला. दिलेल्या तक्रारीकडे नगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ आत्मदहन करण्याचा प्रयत्न करु लागला. यावेळी बंदोबस्तावरील पोलीस आणि नगरपालिका कर्मचारी हस्तक्षेप करीत वेळीच त्याला ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांना मी आत्मदहन करणार नसल्याचे लिहून दिल्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात`कोविशिल्ड’चे 1 लाख डोस उपलब्ध

Abhijeet Shinde

मुलाचे भांडण सोडवताना धक्काबुक्कीत वृद्धाचा मृत्यू

Abhijeet Khandekar

चांदोली, वारणा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आदेश होऊन वर्ष उलटले तरी `जैसे थे’च

Abhijeet Shinde

एस. टी. महामंडळात दुसऱ्या ही दिवशी आढळला कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

दोन टप्प्यात एफआरपी देण्यासाठी राज्य शासनाने काढलेल्या आदेशाची होळी

Sumit Tambekar

कोल्हापूर जिल्ह्यात 20 ते 26 जुलै प्रतिबंधात्मक आदेश; काय सुरू, काय बंद ?

Abhijeet Shinde
error: Content is protected !!