प्रतिनिधी / इचलकरंजी
कागवाडे मळ्यातील खुल्या मैदानाशेजारील पालिकेच्या क्वॉटर्समध्ये सुरु असलेल्या तीन पानी जुगार अडुयावर पोलिसानी शुक्रवारी रात्री छापा टाकला. अड्डामालक असलेल्या पालिकेच्या सुरक्षारक्षकासह नऊ जणाना अटक केली. त्याच्याकडून 10 हजारांची रोकड, 5 मोटारसायकल आणि 7 मोबाइल संच असा 3 लाख 50 हजारांचा मुद्देमाल केला जप्त केला. ही कारवाई नूतन पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या पथकाने केली.
अटक केलेल्याच्यामध्ये अडडामालक व पालिका कर्मचारी विनोद अशोक कोपार्डे (वय ४३, रा.लिंबू चौक, इचलकरंजी), दतात्रय शामराव गवळी (वय ५२ ), पिंटू आप्पासो बुरजे (वय ४० ), शिवानंद दुंडाप्पा गवळी (वय ३०), रमेश सदाशिव चव्हाण (वय २९, सर्व रा. लंगोटे मळा, इचलकरंजी), विशाल अरुण शिंदे (वय ३४,आभार फाटा, सहारानगर, चंदूर, ता. हातकणगले), दिनेश बाबूलाल जोशी (वय ३२, रा.गुरु कनाननगर, इचलकरंजी), योगेश महादेव लंबे (वय ३८, रा. काडापूरे मळा, इचलकरंजी), शुभम संजय आरेकर (वय २१, रा. संभाजी चौक, इचलकरंजी) याचा समावेश आहे.
पोलिसांच्या कडून समजलेली माहिती अशी, हत्ती चौक येथील कागवाडे मळ्यातील खुल्या मैदानाशेजारील पालिकेच्या क्वॉटर्समध्ये गेल्या काही दिवसापासून तीन पानी जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती नूतन पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या भरारी पोलीस पथकाला समजली. तसेच हा अड्डा पालिकेचा सुरक्षारक्षक चालवित असल्याची माहिती सुद्धा पोलिसाना बातमीदाराकडून समजली. त्यानुसार या अड्डावर शुक्रवारी रात्री छापा टाकला . त्यावेळी या ठिकाणी नऊ जण जुगार खेळत असल्याचे मिळून आले. त्यामध्ये अड्डामालक व पालिका कर्मचारी विनोद कोपार्डे हा सुद्धा मिळून आला. त्या सर्वाना अटक करीत त्यांच्याकडून 10 हजारांची रोकड, 5 मोटारसायकल आणि 7 मोबाइल संच असा 3 लाख 50 हजारांचा मुद्देमाल केला. या कारवाईने पालिका कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे.


previous post
next post