Tarun Bharat

इचलकरंजी येथील जवाहरनगरात चोरट्यांनी बंद घर फोडले

Advertisements

प्रतिनिधी / इचलकरंजी


इचलकरंजी येथील जवाहरनगरातील कापड विक्रेत्यांच्या बंद असलेल्या घराच्या दरवाज्याचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यानी आत प्रवेश केला घरातील कपाट फोडून त्यातील २० हजारांची रोकडसह सुमारे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिणे असा सुमारे दिड लाखाचा ऐवज लंपास केला. या चोरीची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे.

जवाहरनगरातील एका खासगी हॉस्पीटलनजीक मल्लीकार्जुन चंदशेखर गंजाळ के कापड विक्रेता कुटूंबासह राहत आहे . ते दिवाळीच्या सणानिमित्याने सहकुटूंब नातेवाईकांच्याकडे गेले होते. त्यामुळे त्यांच्या घरी राहण्यास कोणीही नव्हते यांची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाज्याची कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून त्यातील २० हजारांची रोकडसह सुमारे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिणे असा सुमारे दिड लाखाचा ऐवज लंपास केला. गुरुवारी दुपारी गंजाळ बाहेर गावातून घरी आले असता त्यांना घरी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या चोरीची तक्रार नोंद करण्यासाठी त्वरीत शिवाजीनगर पोलिसात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत या चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

Related Stories

शेत नांगरताना ट्रॅक्टर खाली सापडून ड्रायव्हरचा मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : लस घेण्यापूर्वी रक्तदान करा, रक्तटंचाई टाळा !

Abhijeet Shinde

लातूर : देवणी तालुक्यात एकाचा खुन, आरोपीला केली अटक

Abhijeet Shinde

कोल्हापूर : बेजबाबदारपणे मोर्चा काढल्याप्रकरणी १४ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Abhijeet Shinde

सीमा बांधवांच्या समर्थनात करवीर तालुक्यातील शिवसैनिक उतरले मैदानात

Abhijeet Shinde

संगणक खरेदीची प्रधान सचिवांमार्फत चौकशी करा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!