Tarun Bharat

इजिप्तची ऐतिहासिक शाही परेड

21 तोफांच्या सलामीनंतर 22 ममींची परेड

3000 वर्षे जुनी आहे ही ममी, यात 18 राजे आणि 4 राण्यांचा समावेश

इजिप्तमध्ये शनिवारी रात्री शाही परेड काढण्यात आली आहे. ही परेड विशेष होती, कारण यात कुठला राष्ट्राध्यक्ष नव्हे तर 300 वर्षे जुन्या 22 ममी सामील होत्या. त्यांना राजधानी कैरोपासून 8 किलोमीटर अंतरावरील नॅशनल म्युझियममध्ये नेण्यात आले आहे. परेड सुरू होण्यापूर्वी ममींना 22 तोफांची सलामी देण्यात आली.

त्यानंतर भव्य लाइट-म्युझिक कार्यक्रमादरम्यान म्युझियम येथे परेड पोहोचली. या ममींमध्ये 18 राजे आणि 4 राण्यांच्या ममी आहेत. यात राजा रामसेस द्वितीय, सेती प्रथम, राणी हटशेपसूट इत्यादींचा समावेश आहे. या परेडदरम्यान लोक पारंपरिक वेशभूषेत दिसून आले आहेत.

कैरो येथील म्युझियममध्ये ममींना एकत्र ठेवण्यात आल्याने पर्यटक त्यांना एकाच ठिकाणी पाहू शकणार आहेत. आर्थिक संकटाला तोंड देणाऱया सरकारला ममी पाहण्यासाठी पर्यटक येत देशाचे उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा आहे. नवे संग्रहालय 18 एप्रिलपासून सर्वसामान्य जनतेसाठी खुले करण्यात येणार आहे.

ममींना सर्वसामान्य जनतेसमोर परेडदरम्यान सोनेरी रंगाच्या वाहनात ठेवण्यात आले. यादरम्यान रस्त्यांवरील झटक्यांमुळे ममींना नुकसान पोहोचू नये याकरता वाहनात शॉक-ऍब्जॉर्वरही लावण्यात आले होते. या ममींना पूर्वीच्या तुलनेत अधिक चांगल्या पेटय़ांमध्ये ठेवले जाणर आहे. आर्द्रता आणि तापमान नियंत्रित करण्याची व्यवस्था असल्याने त्यांना दीर्घकाळापर्यंत सुरक्षित ठेवता येईल. जुन्या संग्रहालयात अशी व्यवस्था नव्हती असे कैरोतील इजिप्टोलॉजीच्या प्राध्यापिका सलीमा इकराम यांनी सांगितले आहे.

Related Stories

आधुनिक उपग्रहाची इराणला रशियाकडून भेट!

Patil_p

जगभरात कोरोनाने घेतले 27 लाख बळी

datta jadhav

पाकिस्तान : व्हॅन नदीत कोसळून 17 ठार

datta jadhav

केवळ चिप्स अन् बर्गर खाणारी युवती

Patil_p

म्हणून साजरा करतात ‘कारगिल विजय दिवस’

Rohit Salunke

सुटीनिमित्त विदेशी गेलेल्या मंत्र्यांचा राजीनामा

Patil_p