Tarun Bharat

इजिप्तमध्ये सापडल्या 27 प्राचीन शवपेट्या

Advertisements

ऑनलाईन टीम / कैरो : 

पिरॅमिडचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इजिप्‍तमध्ये अंदाजे 2500 वर्षांपूर्वीच्या 27 शवपेट्या आढळून आल्या आहेत. इजिप्‍तच्या पर्यटन व दुर्मीळ वस्तू मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. 

कैरोच्या दक्षिणेला असलेल्या सक्कर येथे पुरातत्व शास्त्रज्ञांना 36 फूट खोल विहिरीत या शवपेट्या सापडल्या आहेत. या पेट्या लाकडी आहेत. त्यावर नक्षीकाम करून पेट्या लाल, काळ्या, पांढऱ्या, निळ्या आणि सोनेरी रंगाने रंगविण्यात आल्या आहेत. या शवपेट्यांचे संशोधन करण्याचे काम सुरू झाले आहे. 

सक्करचा परिसर 3000 वर्षांपासून मृतदेह गाडण्यासाठी ओळखला जातो. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, मागील 15 दिवसांपूर्वीही सक्‍कारा येथे उत्खनन करताना पुरातत्त्व संशोधकांना जमिनीत 40 फूट खोलवर एकावर एक अशा पुरण्यात आलेल्या 13 शवपेट्या सापडल्या होत्या. 

Related Stories

लसीने संपणार महामारी

Patil_p

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

datta jadhav

दिल्लीत दिवसभरात 79 नवे कोरोना रुग्ण; 154 जणांना डिस्चार्ज!

Tousif Mujawar

मुकेश अंबानी-एकनाथ शिंदेंची ‘वर्षा’वर भेट; रात्री उशिरा बंद दाराआड चर्चा

datta jadhav

अन्नधान्य निर्यातीसाठी मिळणार चालना..!

Nilkanth Sonar

अमरनाथ यात्रेबाबत संभ्रम कायम

prashant_c
error: Content is protected !!