Tarun Bharat

इटलीत अडकलेल्या 300 गोमंतकीय दर्यावर्दीचे आज गोव्यात आगमन, सकाळी व दुपारी दोन विमाने दाबोळीत दाखल होणार

प्रतिनिधी / वास्को

इटलीमध्ये अडकून पडलेल्या गोव्यातील दर्यावर्दीना घेऊन दोन विमाने आज बुधवारी दाबोळी विमानतळावर उतरणार आहेत. सकाळी व दुपारी ही खास चार्टर विमाने इटलीहून थेट गोव्याकडे झेपावणार असून या दोन विमानांतून तीनशे गोमंतकीय दर्यावर्दी उतरणार असल्याची खात्रीदायक माहिती दाबोळी विमानतळ सुत्रांकडून मिळाली.

इटलीमध्ये अडकलेल्या 414 गोमंतकीय दर्यावर्दीना खास विमानांतून थेट दाबोळी विमानतळावर आणण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उघड केले होते. या दर्यावर्दीना घेऊन शनिवारपर्यंत ही विमाने दाबोळी विमानतळावर उतरणार होती. मात्र, यासंबंधी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार आज बुधवारी सकाळी व दुपारी इटलीहून दोन खास विमाने गोव्यात दाखल होणार असून या दोन विमानांतून 300 दर्यावर्दी दाबोळीत उतरणार आहेत. दाबोळी विमानतळावर दर्यावर्दी उतरणार असल्याने विमानतळावर खास व्यवस्था करण्यात आलेली आहे. सकाळपासून विमानतळावर खास पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.

इटलीहून दाबोळी विमानतळावर उतरणाऱया दर्यावर्दींचे आगमन होताच प्रथम त्यांचे थर्मल स्कॅनिंग होईल. त्यानंतर परदेशगमन विभागात त्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर कस्टम क्लीअरन्स होईल व शेवटी आरोग्य तपासणी आणि त्यांचे स्वॅब(लाळ) नमुने गोळा करून त्यांची रवानगी कॉरन्टाईनसाठी करण्यात येईल. त्यांना कॉरन्टाईन केंद्रांपर्यंत घेऊन जाण्यासाठी विशेष वाहतुक व्यवस्था करण्यात आलेली आहे. इटलीत अडकलेल्या अन्य गोमंतकीय दर्यावर्दीना गुरूवारी गोव्यात आणण्यात येणार आहे.

Related Stories

गोवा शिपयार्ड प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्षपदी किशोर शेट

Amit Kulkarni

कोरोना दृष्टचक्र चालूच, 21 बळी

Amit Kulkarni

काणका सर्कल जवळील रस्त्यावरील बेकायदेशीर गाळे काढण्याचा इशारा

Patil_p

मडगावातील विक्रेत्यांचा पालिकेवर मोर्चा

Amit Kulkarni

आपत्ती व्यवस्थापन 15 मे पासून

Omkar B

विशांत गावडे यांच्या माटोळीला दुसरे बक्षीस

Amit Kulkarni