Tarun Bharat

इटलीत 104 वर्षाच्या आजींनी केली कोरोनावर मात

Advertisements

ऑनलाईन टीम / रोम : 

इटलीतील 104 वर्षाच्या आजींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. अदा जोनुसो असे या आजींचे नाव आहे. 

उत्तर इटलीतील बीला या प्रातांत त्यांना संसर्ग झाला.17 मार्चला या आजी आजारी पडल्या. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. आजींनीही वयाच्या 104 व्या वर्षी उपचाराला प्रतिसाद देत कोरोनावर मात केली. कोरोनावर मात करणाऱ्या या आजी सर्वाधिक वयाच्या करोनाबाधित रुग्ण ठरल्या आहेत. अदा जोनुसो यांच्या मुलाने याबाबतची माहिती दिली आहे.
 

इटलीत आतापर्यंत जगातील सर्वात जास्त कोरोनाचे बळी गेले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत 1 लाख 39 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली तर 17 हजार 669 जणांचा मृत्यू झाला आहे. 26 हजार 491 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. 

Related Stories

कोलिन पॉवेल यांचे निधन

Patil_p

‘डेल्टा’विरोधात फायझर, मॉडर्नाचा प्रभाव कमी

datta jadhav

थायंलड, सिंगापूरसोबत भारताचा सागरी युद्धाभ्यास

Omkar B

जगभरात 1.86 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

ब्रिटनमध्ये मार्चपर्यंत टाळेबंदी

Patil_p

जगभरात 1.41 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav
error: Content is protected !!