Tarun Bharat

इटालिया, गढवी, अल्पेश होणार विजयी

केजरीवालांचा पुन्हा लेखी स्वरुपात दावा

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुजरात निवडणुकीवरून सोमवारी पत्रकार परिषद घेतली आहे. गुजरात निवडणुकीत आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया, मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार ईसुदान गढवी आणि वराछाचे उमेदवार अल्पेश कथेरिया विजयी होणार असल्याचा दावा केजरीवालांनी पुन्हा एकदा कागदावर लिहून केला आहे.

गुजरातच्या महिलांनी आम आदमी पक्षाला मतदान करावे. महिलांनी स्वतःच्या कुटुंबीयांना आम आदमी पक्षाला मतदान करण्यासाठी समजवावे. आपला मतदान केल्यास मोफत वीज, प्रत्येक महिलेला दर महिन्याला एक हजार रुपये, मोफत अन् उत्तम उपचारासह महागाईपासून मुक्ती मिळणार असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे. राज्यात आप सरकार येणार असल्याने भाजप बिथरला असल्याचे केजरीवालांनी रविवारी म्हटले होते.

Related Stories

जखमी माकडाची काळजी

Patil_p

विधानपरिषद निवडणुकीत भाजप, काँग्रेस समबल

Patil_p

कुठल्याही आव्हानाकरता भारत सज्ज

Patil_p

टार्गेट किलिंग रोखण्यासाठी पाकिस्तानशी चर्चा करा!

Amit Kulkarni

शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीन सीमेवरील सैन्य माघारी परतणार : राजनाथ सिंह

Tousif Mujawar

सत्तेवर आल्यास 5 वर्षे मोफत धान्य देणार

Patil_p