मागील वर्षातील आकडेवारीचा समावेश
नवी दिल्ली
वाढती महागाई आणि कोरोनाच्या महामारीच्या प्रवासात गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडकडे (गोल्ड इटीएफ) गुंतवणूकदार वळले आहेत. याचा परिणाम म्हणून मागील वर्षात म्हणजे 2021 मध्ये गोल्ड इटीएफमध्ये 4,814 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या (एएमएफआय) आकडेवारीमधून ही माहिती मिळाली आहे. साधारणपणे हा आकडा वर्ष 2020 च्या 6,657 कोटी रुपयाच्या तुलनेत कमी राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.
चालू वर्षातही आकर्षण राहणार
क्वांटम म्युच्युअल फंड्चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिमी पटेल यांनी म्हटले आहे, की जागतिक पातळीवरील सुधारणात्मक स्थितीमुळे मजबूत गुंतवणूकदारांचा कल इटीएफकडे राहिला आहे. 2022 मध्ये गोल्ड ईटीएफचे आकर्षण कायम राहणार असल्याचे ते म्हणाले.