Tarun Bharat

इतका अभ्यास बरा नाही; संजय राऊतांचा राज्यपालांना खोचक टोला

Advertisements

मुंबई \ प्रतिनिधी

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे हिवाळी अधिवेशनाचे वातावरण तापले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अभ्यास करूनच निर्णय देतो असे आश्वासन महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले होते. राज्यपालांच्या या आश्वासनावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी खरपूस टिका केली आहे. इतका अभ्यास बरा नाही. त्यांच ओझं झेपलं पाहिजे असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे.

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘राज्यपालांनी अभ्यासासाठी वेळ मागितला आहे. आपले राज्यपाल अभ्यासू आहेत. इतका अभ्यास बरा नाही. अशा अभ्यासाचे ओझे झेपले पाहिजे. राज्यघटनेमध्ये काही गोष्टी स्पष्ट लिहिलेल्या आहेत. त्यामुळे एवढा अभ्यास करण्याची गरज नाही’ असा अप्रत्यक्ष सल्ला राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांना दिला आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मात्र, अजून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून निवडणूक कार्यक्रमाला मंजूरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेते रविवारी राज्यपालांना भेटले होते. पण राज्यपालांनी मी कायेदशीर अभ्यास करुन निर्णय देईन असा प्रतिसाद दिला होता. यावरुनच संजय राऊतांनी टोला लगावला आहे.

Related Stories

तुरुंगातून बाहेर आल्यापेक्षा अमोल किर्तीकर सोबत असल्याचा जास्त आनंद- संजय राऊत

Archana Banage

सातारा : आज 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 93 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह

Archana Banage

भाजप-शिवसेना युतीमुळेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा

datta jadhav

फलटणमध्ये आयपीएलवर सट्टा

Patil_p

आग्रह केला असता तर मुख्यमंत्रीपद मिळाले असते पण… देवेंद्र फडणवीस

Abhijeet Khandekar

लातूरमध्ये 15 ते 30 जुलै दरम्यान कडक लॉक डाऊन

Tousif Mujawar
error: Content is protected !!