Tarun Bharat

इतके बळ कोठून मिळते?

प्रतिनिधी / बेळगाव

तुमचा रोजचा दिनक्रम काय? असा प्रश्न पोलीस उपायुक्तांनी विचारला आणि भिडे गुरुजींनी दंड, बैठका व सुर्यनमस्काराचा आकडा सांगितला. 150 च्या पुढील ही आकडेवारी आणि गुरुजींचे वय पाहून बेळगावचे पोलीस उपायुक्त विक्रम आमटे भारावून गेले. इतके बळ कोठून मिळते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी आणि बेळगावचे पोलीस उपायुक्त आयपीएस विक्रम आमटे यांची रविवारी सकाळी भेट झाली. काही कामानिमित्त आलेल्या गुरुजींशी संवाद साधून आपल्याला बरे वाटले असे आमटे म्हणाले.

शिवप्रतिष्ठान चे बेळगाव जिल्हाप्रमुख किरण गावडे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. चीन हा प्रमुख शत्रू असून भारताने त्याला लवकरात लवकर नामोहरम केले पाहिजे ही भावना भिडे गुरुजींनी व्यक्त केली. भिडे गुरुजींच्या हस्ते यावेळी विक्रम आमटे यांच्या सन्मान करण्यात आला. नशिल्या वस्तू आणि मटका जुगाराचा बाजार मांडलेल्यांवर कारवाईचा सपाटा सुरू केल्याबद्दल गुरुजींनी आमटे यांचे कौतुक केले.

याप्रसंगी शिवप्रतिष्ठानचे शहर प्रमुख विश्वनाथ पाटील, टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक विनायक बडीगेर आदी उपस्थित होते.

Related Stories

शेवटच्या दिवशी 9 जणांनी दाखल केले अर्ज

Amit Kulkarni

आरबीआयचे संचालक सतीश मराठे यांची ‘लोकमान्य’ला भेट

Amit Kulkarni

जिल्हय़ात पुन्हा कोरोनाचे 13 पॉझिटिव्ह

Patil_p

आविष्कार फौंडेशनचा शिक्षक पुरस्कार चिगुळकर यांना प्रदान

Amit Kulkarni

सीसीआय, जिमखाना, बीएससी, आनंद अकादमीची विजयी सलामी

Amit Kulkarni

कर्नाटकचे कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांनी बेळगाव ईएसआय हॉस्पिटलची केली पाहणी

Tousif Mujawar