Tarun Bharat

इतक्यात निवृत्ती नाही : व्हिनस विलीयम्स

Advertisements

वृत्तसंस्था / लॉस एंजिल्स

आंतर राष्ट्रीय टेनिस क्षेत्रामध्ये बरीच वर्षे आपली मक्तेदारी राखणाऱया विलीयम्स भागिनीनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. व्हिनस आणि सेरेना या भागिनीनी टेनिस क्षेत्रामध्ये अनेक विक्रम गेले आहेत. येत्या बुधवारी 40 व्या वर्षात पदार्पण करणारी व्हिनस विलीयम्सने टेनिस क्षेत्रातून सध्या निवृत्त होण्याची आपली इच्छा नसल्याचे सांगितले.

व्हिनस विलीयम्सने 1994 साली ऑकलंडच्या टेनिस कोर्टवर व्यावसायिक टेनिस क्षेत्रात पदार्पण केले होते. तब्बल 26 वर्षांच्या कालावधीत व्हिनसने डब्ल्यूटीए टूरवरील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या. तिने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत आतापर्यंत ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतील एकेरीची सात अजिंक्यपदे तसेच ऑलिंपिकमधील चार सुवर्णपदके मिळविली आहेत. 2016 साली तैवानमध्ये झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील टेनिस स्पर्धेत तिने आपले शेवटचे एकेरीचे अजिंक्यपद मिळविले होते. आणखी काही वर्षे आपल्याला टेनिस क्षेत्रात खेळावयाचे आहे त्यामुळे तूर्ताला तरी निवृत्तीचा विचार आपला नसल्याचे प्रतिपादन व्हिनसने टेनिस मास्टर्स या वेबसाईटला मुलाखतीत केले आहे. वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत ‘गोल्डन स्लॅम’ पूर्ततेचे स्वप्न मात्र अद्याप अधुरे असून हे स्वप्न अधुरेच राहील, असेही व्हिनसने म्हटले आहे.

Related Stories

भारतीय टीमचा प्रशिक्षक व्हायचे आहे : शोएब अख्तर

Tousif Mujawar

वॉशिंग्टन सुंदरऐवजी जयंत यादवचा समावेश

Patil_p

नागालँड, मणिपूर, चंदीगड उपांत्य फेरीत

Patil_p

ऑस्ट्रेलियाची उपकर्णधार हेन्सला दुखापत

Patil_p

धावपटू सुधा सिंगचा ऍथलेटिक क्षेत्राला निरोप

Patil_p

अबिद अली अर्धशतकासमीप

Patil_p
error: Content is protected !!