Tarun Bharat

इतिहासातील सर्वात मोठी वाईन फॅक्ट्री

तयार व्हायचे 20 लाख लिटर मद्य

इस्रायलमध्ये 1500 वर्षे जुन्या एका विशाल मद्य कारखान्याचा शोध लावण्यात आला आहे. हे बीजान्टिन काळापासून आतापर्यंतची सर्वात मोठी ज्ञात वायनरी आहे. इस्रायल एंटिक्विटीज अथॉरिटीनुसार यवनेमध्ये शोधण्यात आलेली वाईन फॅक्ट्री वर्षाला दोन दशलक्ष लिटर मद्याची निर्मिती करू शकत होती.

पुरातत्व तज्ञांनी यवने शहराच्या आसपास 75,000 चौरस फुटांच्या क्षेत्रात उत्खनन करण्यास दोन वर्षे घेतली ओत. त्यांना 5 मोठी वाइन प्रेस, मद्याच्या विक्रीसाठी गोदाम आणि मद्याची साठवणूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱया मातींच्या भांडय़ांच्या भट्टय़ा मिळाल्या आहेत.

चांगल्याप्रकारे संघटित आणि संरचित कारखान्यात क्षेत्रीय मद्याची निर्मिती केली जात होती. त्याला गाजा किंवा अशकलोन या नावाने ओळखले जायचे. हे मद्य तेव्हा पूर्ण भूमध्यसागरीय क्षेत्रात निर्यात केले जात होते. पाण्याच्या खराब गुणवत्तेमुळे बीजान्टिन काळादरम्यान सुमारे ईसवी सन 520 मध्ये प्रौढ आणि मुलांसाठी मद्यप्राशन नित्याचेच होते.

हे क्षेत्र इस्रायलच्या मध्यक्षेत्रात होते आणि त्या काळात एका क्षेत्रासाठी पुरेसे महत्त्वपूर्ण होते. हे तीन मोठे चर्चेस असणारे ख्रिश्चन शहर होते. पण ईसवी सन 520 च्या आसपास एकाच कालावधीत शहरात ज्यू आणि सामरी लोकांचे वास्तव्य होते. ही वाइनरी 1500 वर्षांपूर्वीची असून यातील मद्याची निर्मिती ही प्रामुख्याने मनुष्यबळाचा वापर करून व्हायची अशी माहिती आयएए पुरातत्वतज्ञ डॉ. जॉन सेलिगमॅन यांनी सांगितले आहे.

Related Stories

तालिबानपासून वाचविले, आता पोलिओपासून वाचवू

Patil_p

शस्त्रक्रियेमुळे झाला सरळ

Patil_p

कोरोनाने जगभरातून संपविला फ्ल्यू विषाणू?

Patil_p

मांजरांसाठीचे औषध कोरोना संसर्गावर उपयुक्त

Patil_p

भारतात धावली पहिली डबलडेकर मालगाडी

Patil_p

आठवडाभर झोपून राहायचे लोक

Patil_p