Tarun Bharat

इथॅन वाझचा पश्चिम आशियाई बुद्धिबळमध्ये सुवर्णपदकांचा डबल धमाका

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

यंदाच्या बुद्धिबळ खेळाच्या मोसमात आपला जबरदस्त फॉर्म कायम राखताना गोव्याच्या इथॅन वाझने पश्चिम आशियाई ऑनलाईन बुद्धिबळ 2021 स्पर्धेचे 10 वर्षांखालील खुल्या गटातील जेतेपद मिळविले. चेस फेडरेशन ऑफ श्रीलंकाने या स्पर्धेचे आयोजन आशियाई बुद्धिबळ संघटना आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या अधिपत्याखाली केले होते.

पश्चिम आशियाई ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद इथॅनने राखले. 2019 मध्ये 8 वर्षांखालील खुल्या गटात त्याने सुवर्ण जिंकले होते. यंदा वैयक्तिक जेतेपदाबरोबर त्याचा समावेश असलेल्या भारताला सांघिक प्रकारातही सुवर्णपदक प्राप्त झाले.

वैयक्तिक विभागात इथॅन वाझला दुसऱया फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर आपल्या आक्रमक आणि चतुरस्त्र खेळाचे प्रदर्शन करताना इथॅनने लागोपाठ खेळलेले सातही सामने जिंकले आणि 9 पैकी 8 गुणांनी जेतेपदावर कब्जा केला. गोव्याचे नाव पुन्हा आंतरराष्ट्रीय नकाशावर रोशन केल्याबद्दल गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी इथॅनचे अभिनंदन केले आहे.

इथॅनने राज्य, राष्ट्रीय, पश्चिम आशियाई, आशियाई शालेय आणि विश्व बुद्धिबळ स्पर्धेत पदके प्राप्त केली आहेत. प्रोफेशनल खेळाडू बनू इच्छिणाऱया गोव्याच्या युवा चेसपटूंसाठी इथॅन वाझ हा एक रोल मॉडेल असल्याचे यावेळी गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव शरेंद्र नाईक म्हणाले. पश्चिम आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याच्या दिया सावळ आणि एड्रिक वाझ यांनी अनुक्रमे 8 व 12 वर्षांखालील गटात पहिल्या दहा खेळाडूंत स्थान मिळविले. दोघांनाही 6.5 गुणांनी नववे स्थान प्राप्त झाले. या स्पर्धेत 16 पश्चिम आशियाई देशातील 898 बुद्धिबळपटूंनी भाग घेतला होता.

Related Stories

काँग्रेस जनतेचा आवाज अधिवेशनात उठवणार

Patil_p

तर सरकारला पुरेशा साधनसुविधा उपलब्ध कराव्या लागणार !

Omkar B

नाणूस बेतकेकरवाडा सातेरी ब्राह्मणी महादेव देवस्थानच्या जत्रोत्सवात धोंडगण 17 अग्निदिव्य पार करणार

Amit Kulkarni

एफसी गोवाचा सामना आज चेन्नईनशी

Amit Kulkarni

झुवारीचा पहिला टप्पा पूर्णत्वाकडे

Amit Kulkarni

हाताला काम नाही..आणि पुरेशे जेवणही नाही..!

Patil_p