Tarun Bharat

इनफीनिटम व्योमामध्ये ज्ञानप्रबोधन मंदिरचे सुयश

प्रतिनिधी /बेळगाव

जैन हेरीटेज हायस्कूल आयोजित आंतरशालेय ‘इनफीनिटम व्योमा’ महोत्सवात तरुण भारत ट्रस्टच्या ज्ञान प्रबोधन मंदिर आयसीएसई स्कूलच्या माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विविध स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावत विद्यार्थ्यांनी जनरल चॅम्पियनशीप मिळविली.

 फॅशन शो स्पर्धेमध्ये रश्मिता आजगावकर हिने प्रथम, मास्टर व्योमामध्ये निरंजन चिंचणीकर याने प्रथम, स्टॅन्डप कॉमेडीमध्ये संकल्प साखरे याने द्वितीय, गायन स्पर्धेत तन्वी इनामदार, सर्वेश देसाई, श्रावणी गुरव, प्रगती शिंदोळकर, सृष्टी बिर्जे यांनी तृतीय, पथनाटय़ स्पर्धेत जुई चंदगडकर, नित्यप्रिका कुलकर्णी, मदन गुरव, सान्वी तुळपुले, हंसिका सायनानी, रुद्र कुलकर्णी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. प्राथमिक विभागात फॅन्सी ड्रेस स्पर्धेत शौर्य सालीमठ याने प्रथम क्रमांक मिळविला.  

शाळेचे प्रशासक अधिकारी डॉ. गोविंद वेलिंग व प्राचार्या मंजिरी रानडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शिक्षिका रेबेला सेराफीम आणि मोनिका मेंडीस यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

Related Stories

खाते उघडण्यासाठी बेळगाव पोस्ट कार्यालयात तोबा गर्दी

Tousif Mujawar

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात हेपॅटायटिस बी लसीकरण

Amit Kulkarni

शाळा- महाविद्यालयांमध्ये शिवजयंती साजरी करा

Amit Kulkarni

सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव एकमताने मंजूर

Archana Banage

प्रवाशाला रेल्वे पोलीसांनी बाहेर काढले मृत्यूच्या दाढेतून

Patil_p

महिन्याभरात पेट्रोल 3 रुपयांनी वधारले

Patil_p