Tarun Bharat

इनरव्हील क्लब, वेंगुर्लेच्या अध्यक्षपदी ज्योती देसाई

Advertisements

वेंगुर्ले वार्ताहर:

इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लेच्या सन 2021-22 च्या नुतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली आहे. या कार्यकारीणीवर अध्यक्षपदी ज्योती देसाई तर सचिवपदी स्मिता दामले यांची एकमताने निवड झाली आहे.इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लेच्या नुतन कार्यकारीणी निवडीची सभा साईमंगल कार्यालयाच्या सभागृहात इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा गौरी मराठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत क्लबच्या सन 2021-22 या वर्षासाठी नुतन कार्यकारीणीची निवड एकमताने करण्यात आली. या कार्यकारीणीत अध्यक्षपदी ज्योती देसाई, उपाध्यक्षपदी अफशान कौरी, सचिवपदी स्मिता दामले, खजिनदारपदी समिक्षा वालावलकर, आय.एस.ओ.पदी वृंदा गवंडळकर, एडीटरपदी  पूजा कर्पे या पदांवर निवड झाली आहे.या नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा बुधवार दि. 21 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता साईमंगल कार्यालय, वेंगुर्ले येथे विद्या करंदीकर व प्रमुख पाहुण्या उमा पाटील यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन होणार आहे.

Related Stories

इसिसच्या दहशतवाद्यांचा रत्नागिरी शहरात होता वावर

Patil_p

खवल्या तस्करीमागे चिनी कनेक्शन?

Patil_p

भारती शिपयार्ड ठेकेदारांचे रखडलेल्या बिलांसाठी आंदोलन

Archana Banage

एसटी संप सुरूच, आणखीन 6 कर्मचारी बडतर्फ

Patil_p

मंदिरांमध्ये पुजाऱयांची नियुक्ती धर्मशास्त्रानुसार!

NIKHIL_N

जेलीफिशचा वाढता वावर मासेमारीच्या मुळावर

Patil_p
error: Content is protected !!