Tarun Bharat

इनेस डी रॅमनला डेट करतोय ब्रॅड पिट

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिट स्वतःच्या लव्ह लाइफवरून नेहमीच चर्चेत राहत असतो. ब्रॅडचे नाव नेहमीच कुठल्यातरी अभिनेत्री किंवा मॉडेलशी जोडले जाते. ब्रॅड पिट आता अभिनेता पॉल वेस्लीची पूर्वाश्रमीची पत्नी इनेस डी रॅमनसोबत दिसून आला आहे. ब्रॅड अन् इनेस हे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. अँजेलिना जोलीशी घटस्फोट झाल्यावर ब्रॅड नव्याने प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे.

Actor Brad Pitt arrives for the premiere of the film ‘Bullet Train’ in Los Angeles, California, August 1, 2022. REUTERS/David Swanson

ब्रॅडने स्वतःचे मित्र सिंडी क्रॉफर्ड, रेंडे गेरबर, सीन पेन आणि विवि नेवो यांच्याशी इनेस डी रॅमनची ओळख करून दिली आहे. इसेन ही ब्रॅडच्या टीमचा हिस्सा असल्याचे समजते. ब्रॅडने अँजेलिना जोलीसोबत घटस्फोट घेतला आहे. परंतु दोघांमधील काही वादांप्रकरणी अमेरिकेतील न्यायालयात अद्याप सुनावणी सुरू आहे.

इनेस डी रॅमन आणि पॉल वेस्ले यांनी 2019मध्ये विवाह केला होता. परंतु सप्टेंबर 2022 मध्ये या दोघांनी विभक्त झाल्याची घोषणा केली होती. त्यापूर्वी अनेक महिन्यांपासून ते वेगळे राहत होते. विभक्त होण्याचा निर्णय दोघांनी घेतल्याचे सांगण्यात आले होते. वेस्ली अलिकडेच इटलीत मॉडेल नताली कुकेनबर्गसोबत दिसून आला होता.

Related Stories

टीना दत्ताला मिळाला मोठा चित्रपट

Patil_p

12 कोटींच्या फ्लॅटसाठी मुंबईत अभिनेत्रीची हत्या; मृतदेह फेकला माथेरानच्या जंगलात

datta jadhav

अंकितानं साजरी केली लग्नानंतरची पहिली संक्रांत

Patil_p

कन्नड चित्रपटांमध्ये जॅकलीनची एंट्री

Patil_p

पठाण’मध्ये दीपिकाचे ऍक्शन सीन

Patil_p

‘हिंग पुस्तक तलवार’चा हास्यकल्लोळ आता जगभर

Patil_p