Tarun Bharat

इन्फोसिससह अन्य कंपन्यांच्या कामगिरीने तेजी

सेन्सेक्स 329 अंकांनी वधारला : निफ्टी 10,383.00 वर बंद

वृत्तसंस्था  / मुंबई

चालू आठवडय़ात भारत-चीन सीमा संघर्ष आणि देशातील वाढती कोविड रुग्णांची संख्या यांच्या प्रवासात शेअर बाजाराचा प्रवास हा तेजी व घसरणीचा राहिला. यामुळे सलग बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात शेअर बाजार घसरला आहे तर अंतिम दिवशी शुक्रवारी मात्र मुंबई शेअर बाजारातील इन्फोसिस, एचडीएफसी बँक, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यासारख्या दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीच्या जोरावर सेन्सेक्सने 329 अंकांची तेजी मिळवली होती. यामुळेच मुंबई शेअर बाजाराचा घसरणीचा प्रवास थांबल्याचे पहावयास मिळाले आहे.

बीएसईमधील प्रमुख 30 कंपन्यांच्या जोरावर सेन्सेक्स दिवसअखेर 329.17 अंकांनी वधारत 35171.27 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 94.10 अंकांनी वधारुन निर्देशांक 10,383.00 वर बंद झाला.

प्रमुख कंपन्यांमध्ये शुक्रवारी इन्फोसिसचे समभाग सर्वाधिक सात टक्क्मयांनी तेजीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये टीसीएस, इंडसइंड बँक, ओएनजीसी, एचडीएफसी बँक आणि एचसीएल टेक यांचे समभाग वधारले आहेत. दुसऱया बाजूला  आयटीसी, बजाज फायनान्स, कोटक बँक आणि सन फार्मा यांचे समभाग मात्र घसरले आहेत. महिनाभराच्या गुंतवणुकीच्या जोरावर शेवटच्या दिवशी समभाग विक्री झाल्याचे दिसून आले. यासोबतच जागतिक शेअर बाजारांमधील सकारात्मक वातावरणाच्या कामगिरीमुळे देशातील शेअर बाजारांची कामगिरी मजबूत राहिली असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.

मागील दोन आठवडय़ात सलग वृद्धीनंतर बाजार चालू आठवडय़ात काही प्रमाणात अस्थिर झाला असल्याचे एम के वेल्थ मॅनेजमेंटच्या प्रमुखांनी सांगितले आहे. यामध्ये मुख्य स्वरुपात अमेरिका आणि भारत यांच्यातील कोरोना विषाणूच्या संकटाच्या वाढत्या चिंतेमुळे शेअर बाजार दबावात राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.

Related Stories

पेटीएमच्या समभागात 13 टक्के घसरण

Amit Kulkarni

इन्फोसिसचे बाजार भांडवल 7 लाख कोटींवर

Patil_p

मित्रों ऍपचे 10 कोटी वापरकर्ते करण्याचे उद्दिष्ट

Patil_p

अमेरिकन कंपनी ‘टेस्ला’चा भारतात प्रवेश

Patil_p

‘रेलटेल’ला मिळाले 11 कोटींचे कंत्राट

Patil_p

गुगलला चुकीच्या प्रश्नाच्या उत्तराचा फटका

Patil_p