Tarun Bharat

इपीएफओत डिसेंबरमध्ये जोडले गेले 14 लाख सदस्य

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात इपीएफओत डिसेंबर 2021 मध्ये 14.60 लाख नव्या सदस्यांची नेंदणी झाली आहे. डिसेंबर 2020 च्या तुलनेत सदस्य संख्येत 16 टक्के इतकी वाढ झाली आहे. डिसेंबर 2020 मध्ये 12.54 लाख नवे सदस्य संघटनेशी जोडले गेले होते.

 नोव्हेंबर 2021 मधील नेंदणीपेक्षा 19 टक्के नोंदणी अधिक आहे. सदस्य नोंदणी करण्यात महाराष्ट्र आणि हरयाणा ही राज्ये आघाडीवर राहिली आहेत. यापाठोपाठ गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक ही राज्ये असून या सर्वांनी एकत्रित मिळून डिसेंबर महिन्यात 8.97 लाख सदस्य जोडले आहेत.

 महिलांची संख्या अधिक

इपीएफओत सदस्य जोडणीचा विचार करता महिलांची संख्या अधिक राहिली आहे. 3.87 लाख महिला सदस्य इपीएफओत जोडले गेले आहेत. 18 ते 21 वर्षाच्या सदस्यांची संख्या 2.97 लाख इतकी आहे.

आर्थिक वर्षात 77 लाख नवे सदस्य

 इपीएफओत दर महिन्यात अंदाजे सरासरी 7 लाख नवे सदस्य जोडले जात आहेत. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये एकंदर 77.08 लाख नवे सदस्य या संघटनेत सामील झाले आहेत.

Related Stories

युपीआयची ऑटो-पे सुविधा सादर

Patil_p

ऑक्टोबरपासून एअर बॅगची सक्ती

Patil_p

20 जानेवारी रोजी इंडिगो पेन्ट्सचा आयपीओ

Patil_p

फ्लिपकार्ट देणार जिओमार्टला टक्कर

Patil_p

रुपया 84 ते 85 पर्यंत घसरु शकतो?

Patil_p

रेल्वे मालवाहतूक उत्पन्न 66 हजार कोटीवर

Patil_p
error: Content is protected !!