Tarun Bharat

इफ्फीमध्ये वाजणार मराठी चित्रपटांचा डंका

गोदावरी, मी वसंतराव आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या यादीत

प्रतिनिधी / पणजी

गोव्यात 20 ते 28 दरम्यान होणाऱया भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतातील मराठी चित्रपटांचा डंका वाजणार आहे. या विभागासाठी भारतातून दोन मराठी चित्रपट आणि एक इतर भाषेतील चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी,’ निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित ‘मी वसंतराव’ तर एमी बरूआ दिग्दर्शित सेमखोर या भारतीय चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

या विभागात स्पर्धेसाठी जगभरातील विशिष्ट श्रेणीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट निवडले जातात. हा विभाग चित्रपट महोत्सवातील महत्त्वाचा भाग मानला जातो. यातील 15 चित्रपट हे सुवर्ण मयूरसाठी आणि इतर पुरस्कारांसाठी स्पर्धा करतात. या विभागात फिनलँडचा हमी रमजान दिग्दर्शित ‘एनी डे नाओ’, पैराग्वेचा साईमन प्रेंको दिग्दर्शित ‘शेर्लोट’, भारताचा निखिल महाजन दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘गोदावरी’, रोमानियाचा राडू मुंटियन दिग्दर्शित ‘एंट्रेगलडे’, न्यू मॅक्सिको युएसएचा शिरीन नेशात आणि शोजा अजारी दिग्दर्शित ‘लॅंड ऑफ ड्रीम्स’, पोलंडचा कटीया प्रिवीजिएन्सव दिग्दर्शित ‘लीडर’ भारताचा निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘मी वसंतराव’, रूसचा दिमित्री फेडोरोव दिग्दर्शित ‘ मॉस्को डज नॉट हैपन’, बांग्लादेशचा मोहम्मद मृधा दिग्दर्शित ‘नो ग्राऊंड बिनीथ द फीट’, क्रोएशिया, बोस्निया आणि हर्जेगोविनाचा ब्रैंको श्मिट दिग्दर्शित ‘वंस वी वर गुड फॉर यू’, जपानचा मसाकाजू कानेको दिग्दर्शित ‘रिंग वांडरिंग’, चेक रिपब्लिकचा वाक्लाव कद्रंका दिग्दर्शित ‘सेविंग वन हू वॉज डैड’, दीमासा भारताचा एमी बरूआ दिग्दर्शित ‘सेमखोर’, रूसचा रोमन वास्यानोव दिग्दर्शित ‘ द डोर्म’, ब्राजीलचा रोड्रीगो डी ओलिवेरा दिग्दर्शित ‘ द फर्स्ट फॉलन’ या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट सुवर्ण मयूर पुरस्काराअंतर्गत रु. 40 लाख रुपये रोख व पारितोषिक दिले जाईल. रोख रकमेव्यतिरिक्त दिग्दर्शकाला सुवर्ण मयूर आणि प्रमाणपत्र दिले जाईल. निर्मात्याला रोख रकमेव्यतिरिक्त प्रमाणपत्र दिले जाईल. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाला सिल्व्हर पीकॉक, प्रमाणपत्र आणि 15 लाखांचे रोख पारितोषिक दिले जाईल. तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरूषाला सिल्व्हर पीकॉक, प्रमाणपत्र आणि 10 लाखांचे रोख पारितोषिक दिले जाईल. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीला रौप्य मयूर, प्रमाणपत्र आणि दहा लाखांचे रोख पारितोषिक दिले जाईल. विशेष ज्युरी पुरस्काराला सिल्व्हर पीकॉक, प्रमाणपत्र आणि पंधरा लाखांचे रोख पारितोषिक दिले जाईल.

Related Stories

बाळ्ळी आंदोलनातील शहिदांना 25 रोजी श्रद्धांजली

Amit Kulkarni

रेव्होल्यूशनरी गोवन्सचे शशीराज नाईक शिरोडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Abhijeet Khandekar

जबाबदारी पेलण्यास सक्षम : डॉ. नूतन बिचोलकर

Amit Kulkarni

कोरोनामुळे पणजी मनपाचा 90 टक्के महसूल बुडाला

Patil_p

मारिया मिरांडांचा राष्ट्रपतांच्या हस्ते गौरव

Amit Kulkarni

म्हादई प्रत्यक्ष पाहणीवेळी कर्नाटकची दंडेलशाही

Amit Kulkarni
error: Content is protected !!