Tarun Bharat

इफ्फी: ज्येष्ठ अभिनेते विश्वजीत चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ ईयर पुरस्कार

गोवा/प्रतिनिधी

गोवा इथल्या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, हिंदी आणि बंगाली चित्रपटांचे गायक विश्वजीत चटर्जी यांना इंडियन फिल्म पर्सनॅलीटी ऑफ इयर पुरस्काराने गौरवण्यात येईल असे माहिती प्रसारण मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

मार्च २०२१ मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
बीस साल बाद चित्रपटातल्या कुमार विजय सिंग,कोहरा मधल्या राजा अमित कुमार सिंग, एप्रिल फुल मधल्या अशोक, मेरे सनम मधल्या रमेशकुमार, नाईट इन लंडन मधला जीवन, दो कलियाॅं मधल्या शेखर,आणि किस्मत मध्ये त्यांनी साकारलेल्या विकीच्या भूमिकेला रसिकांची मोठी पसंती मिळाली. आशा पारेख, वहिदा रेहमान, मुमताज,माला सिन्हा आणि राजश्री या प्रख्यात अभिनेत्रीसमवेत त्यांनी चित्रपटात भूमिका केल्या. त्यांच्या बंगाली चित्रपटांमध्ये चौरीन्घी (1968), उत्तम कुमार यांच्यासमवेत गढ नसीमपूर, कुहेली आणि त्यानंतर श्रीमान पृथ्वीराज (1973),जय बाबा तारकनाथ (1977) आणि अमर गीती (1983) यांचा समावेश आहे. 1975 मध्ये बिस्वजीत यांनी ‘कहते है मुझको राजा’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिगदर्शन त्यांनी केले. अभिनय आणि दिग्दर्शनाबरोबरच गायक आणि निर्माता म्हणूनही त्यांनी काम केले आहे

Related Stories

कोरोनाचे नियम पाळा, लॉकडाऊन टाळा!

Amit Kulkarni

कर्नाटक: मुख्यमंत्र्यांनी बीबीएमपीच्या केंद्रीय बेड व्यवस्थापन यंत्रणेचा घेतला आढावा

Archana Banage

मंगळूर विमानतळावर ३०.७३ लाख रुपयांचे सोने जप्त

Archana Banage

कर्नाटक: सरकार कोरोना मृतांची संख्या लपवत आहे : पाटील

Archana Banage

कर्नाटक : खासगी शाळा कर्मचाऱ्यांचा सरकारवर दबाव

Archana Banage

पाच वर्षांपेक्षा अधिक वर्षे ठाण मांडून असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करा!

Tousif Mujawar