Tarun Bharat

इम्रान खान यांची होणार कोरोना टेस्ट

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :

संपूर्ण जगभरात कोरोनाचा फैलाव वाढतच चालला आहे. त्यातच आता पाकिस्तान मधून एक बातमी येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची आता  कोरोनाची टेस्ट करण्यात येणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान हे एका कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांनी स्वतः ला क्वारंटाईन केले होते. आता त्यांची टेस्ट ही केली जाणार आहे. हा सल्ला त्यांना त्यांच्या वैद्यकीय टीम ने दिला आहे. इम्रान खान यांचे सल्लागार डॉ. फैजल सुलतान यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

पाकिस्तान मधील प्रसिद्ध एधी फाऊडेशनचे प्रमुख अब्दुल सत्तार एधी यांचा मुलगा फैसल याला कोरोनाची बाधा झाली आहे. फैसल याने 15 एप्रिल रोजी इमरान खान यांची भेट घेतली होती. त्यामुळे इम्रान खान यांच्या आरोग्याबाबत ही चिंता व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, सध्या पाकिस्तान मध्ये कोरोना रुग्णांचा आकडा दहा हजारच्या घरात पोहोचला आहे. 197 जणांनी आपला जीव गमावला आहे. 2 हजार 66 लोकांची प्रकृती स्थीर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

पाकिस्तान मधील वाढता आकडा लक्षात घेऊन सरकारने घरीच रहा बाहेर पडू नका, तसेच नागरिकांनी आपल्या घरातच नमाज पठण करावे असे आवाहन करण्यात आले आहे. मशिदीत नमाज पठणासाठी जायचे असल्यास सरकार आणि उलेमा यांच्या ठरलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आणि तसे न झाल्यास मशिदी बंद करण्यात येतील असा इशाराही देण्यात आला आहे. 

Related Stories

सर्वसामान्यांना कर्जाच्या हप्त्यासाठी आणखी 3 महिन्यांची मुदत : RBI

datta jadhav

अजरबैजानच्या सैन्याची सरशी?

Patil_p

40 हजार चिनी नागरिकांना देशाबाहेर काढणार

Patil_p

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू कोरोनाचे नवे हॉटस्पॉट

Archana Banage

ब्रिटनने 90 वर्षीय आजींना दिली कोरोनावरील पहिली लस

datta jadhav

”देवेंद्र फडणवीसांचे केंद्रात वजन असेल तर…”

Archana Banage