Tarun Bharat

इम्रान खान राजवटीत पाक जनता ‘गॅस’वर

नव्या वर्षात देशात महासंकट

इस्लामाबाद

 पाकिस्तानच्या जनतेसाठी नवे वर्ष आनंद नव्हे तर समस्यांचा ढिग घेऊन येणार आहे. पाकिस्तानात नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारी कंपनी सुई नॉर्दन 500 दशलक्ष स्टँडर्ड क्यूबिक फूट प्रतिदिन वायूच्या कमतरतेला तोंड देणार आहे. नैसर्गिक वायूच्या या प्रचंड तुटवडय़ामुळे कंपनीला ऊर्जाक्षेत्राला होणारा वायूपुरवठा रोखावा लागणार आहे.

ऊर्जा क्षेत्रासाठीचा एलएनजी रोखूनही देशातील घरगुती ग्राहकांचे संकट कमी होणार नाही. देशात यानंतरही 250 दशलक्ष स्टँडर्ड क्यूबिक फूट प्रतिदिन वायूचा तुटवडा भासणार आहे. 4 ते 20 जानेवारीदरम्यान वायूचा तुटवडा सर्वाधिक प्रमाणात भासणार असल्याचे मानले जात आहे. इम्रान सरकारने वेळेत नैसर्गिक वायूची खरेदी न केल्याने जनतेला त्रास सोसावा लागणार आहे.

Related Stories

नेपाळ नरमला, भारतीय वृत्तवाहिन्यांवरील बंदी हटविली

Patil_p

नेपाळमध्ये दोन माजी पंतप्रधानांचे धरणे आंदोलन

Patil_p

लूला डा सिल्वा ब्राझीलचे नवे अध्यक्ष

Patil_p

युरोपमध्ये दर 17 सेकंदाला एक मृत्यू

Patil_p

सुडोकूचा गॉडफादर हरपला माकी काजी यांचे निधन

Patil_p

ब्राझील : संसर्ग पुन्हा तीव्र

Omkar B
error: Content is protected !!