Tarun Bharat

इम्रान सरकार कोसळलं, शाहबाज शरीफ होणार नवे पंतप्रधान

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :

पाकिस्तानी संसदेतला अविश्वासाचा ड्रामा मध्यरात्री संपला. 342 सदस्यांच्या पाकिस्तानी संसदेत 174 मतं अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने पडली आणि इम्रान सरकार कोसळलं. आता पाकिस्तानात पुन्हा एकदा नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तानी मुस्लिम लीगचं सरकार येणार आहे.

नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान होऊ न दिल्यानंतर, पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी रात्री 12 वाजता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला होता. अशा स्थितीत न्यायालयाच्या आदेशानंतर मध्यरात्री अविश्वास ठरावावर मतदान झाले. इम्रान यांना सत्ताच्युत करण्यासाठी 342 सदस्यांच्या सभागृहामध्ये विरोधकांना 172 सदस्यांचे बळ आवश्यक होते. अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने 174 मतं पडली. त्यामुळे इम्रान खान यांचे सरकार कोसळले.

इम्रान खान सरकार कोसळल्यावर आता नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ शाहबाज शरीफ हे पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याची माहिती मिळत आहे. पीएमएल शरीफ गटाच्या उपाध्यक्ष आणि नवाझ शरीफ यांच्या कन्या मरियम शरीफ यांनी आधीच शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदासाठी घोषणा केली होती.

Related Stories

गोड नव्हे कडवट चवीचे मध

Patil_p

कृषी सुधारणा भारताचा अंतर्गत विषय – ब्रिटन

Patil_p

पेरुला बसला भुकंपाचा धक्का 41 जण जखमी

Patil_p

ट्रम्प यांच्या विमानाचा अपघात टळला

datta jadhav

स्वीडन पंतप्रधानपदी मॅग्डेलेना अँडरसन

Patil_p

कोरियन चित्रपट पाहिल्याने 2 विद्यार्थ्यांना मृत्युदंड

Patil_p