Tarun Bharat

इम्रान सरकार पाडण्यासाठी 11 प्रमुख पक्ष एकवटले

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

पाकिस्तानमधील इम्रान खान यांचे सरकार पाडण्यासाठी पीडीएम आघाडीतील पीएमएल-एन, पीपीपी, जेयूआय-एफ समवेत 11 प्रमुख विरोधी पक्ष एकवटले आहेत. या विरोधी पक्षांनी इम्रान यांना सत्तेवरून हटवण्यासाठी पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंट नावाची स्वतंत्र आघाडी उभी केली आहे.

पाकिस्तानातील आर्थिक मंदी, भ्रष्टाचार, कोरोना परिस्थिती आणि वाढत्या अत्याचाराच्या घटनांवरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे. इम्रान खान अकार्यक्षम आणि अनभिज्ञ आहेत. त्यांना देशासमोरील समस्या दिसत नाहीत, त्यामुळे ते सरकार चालवू शकत नाहीत, असे आरोप आघाडीने केले आहेत. 

सरकार पाडण्यासाठी नुकतीच डेमोक्रॅटिक मुव्हमेंटआघाडीची बैठक झाली. यात सरकारच्या विरोधात देशभर निदर्शने, मोर्चे आणि सभांचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात इस्लामाबादला एक लॉंग मार्च काढला जाणार आहे. हा मार्च निर्णायक असेल. इम्रान सरकार उलथवून टाकण्याचा निर्धार यातून व्यक्त केला जाईल, असे आघाडीच्या वतीने बिलावल भुट्टो यांनी सांगितले.

Related Stories

एकाचवेळी विद्यार्थ्यांनी लॉगईन केल्याने मॉकटेस्टमध्ये गोंधळ

Abhijeet Khandekar

न्यूझीलंड : अनैतिक संबंधाच्या कारणावरून मंत्र्याची हकालपट्टी

datta jadhav

तुर्की : जगप्रसिद्ध हागिया सोफिया संग्रहालयाचे मशिदीत रूपांतर

datta jadhav

शाहूवाडीतील तळवडे येथे सशस्त्र दरोडा; दोघे जखमी

Abhijeet Khandekar

2 महिला न्यायाधीशांची अफगाणिस्तानात हत्या

Patil_p

दिल्लीत अज्ञात ठिकाणी IPS अधिकारी रश्मी शुक्ला आणि एकनाथ शिंदेंची भेट

Archana Banage