प्रतिनिधी / सांगली
इलेक्ट्रीक दुचाकीची डिलरशीप देतो म्हणून सांगलीतील राजशेखर चंद्रकांत सावळे यांची १७ लाख ९३ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. रिव्होल्ट कंपनीच्या नावाने ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सीआरएम संजीव मिश्रा आणि अश्विनी माथूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत हकीकत अशी की, फिर्यादी राजशेखर सावळे यांनी यु ट्युबवरून रिव्होल्ट कंपनीच्या नावाने असणारे चैनल पहात असताना या कंपनीच्या डिलरशीपसाठी आपला मोबाईल नंबर दिला होता. त्यावेळी त्यांना संशयित मित्रा आणि माथूर यांचा त्यांना फोन आला. त्यामध्ये त्यांनी आम्ही तुम्हाला ही डिलरशीप देण्यास तयार आहोत. त्यासाठीच्या अटी आणि शर्ती त्यांनी सांगितल्या. त्यानुसार सावळे हे त्यानुसार कामाला लागले आणि त्यांनी ही डिलरशीप मिळते म्हणून एक गाळा भाड्याने घेतला. त्याचे फोटो पाठविले. त्यानंतर संशयितांनी सावळे यांना अॅडव्हान्स पैसे भरण्यास सांगितले हे पैसे सावळे यांनी खात्यावर ऑनलाईन भरल्यानंतर तात्काळ त्यांना रिव्होल्ट कंपनीच्या नावाने ओरिजनल पावत्या आल्या. तसेच या कंपनीचा सर्व पत्ता त्यावर आला. त्यामुळे सावळे यांचा विश्वास बसला.
या नंतर संशयित सांगतील तसे त्यांनी पैसे भरले, पण कंपनीकडून कोणताच माल आला नाही. किंवा पुन्हा उत्तर देण्यास टाळाटाळ करू लागल्याने सावळे यांना शंका आली, त्यांनी याची माहिती तात्काळ सांगली शहर पोलीसांना दिली. पोलीसांनी याची चौकशी करण्यासाठी तात्काळ काही कागदपत्रे तसेस बँकेचे स्टेटमेंट गोळा केले. त्यावेळी ही सर्व खाती कंपनीची नसून वैयक्तिक असल्याचे लक्षात आले. मग मात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


previous post