Tarun Bharat

इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत भारत अग्रेसर ठरेल : गडकरी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :    

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीला देशात पर्याय शोधला जात आहे. त्यातच केंद्र सरकारकडून इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून, येत्या काळात भारत इलेक्ट्रीक वाहन निर्मितीत अग्रेसर ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.  

अमेजन संभव संमेलनात दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून गडकरी बोलत होते. ते म्हणाले, प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यावर इलेक्ट्रीक वाहनांना चालना देण्यात येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने शंभरी गाठल्याने नागरिकही इलेक्ट्रीक वाहनांना पसंती देत आहेत. येत्या सहा महिन्यात देशात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱया लिथियम-आयन बॅटरीचे उत्पादन सुरू होईल. त्यामुळे आगामी काही काळात भारत इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱया वाहनांच्या निर्मितीच्या अग्रेसर असेल.   

येत्या दोन वर्षात इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती कमी होतील. त्यामुळे भविष्यात पेट्रोल-डिझेलवरील वाहने आणि इलेक्ट्रीक वाहनांमध्ये स्पर्धा निर्माण होईल, असेही  गडकरी म्हणाले

Related Stories

‘आप’कडून गुजरातमधील उमेदवारांची घोषणा

Patil_p

केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

हैदराबादेतील बलात्काऱ्यांचा एन्काउंटर खोटा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशी आयोगाचा दावा

datta jadhav

इटीएफमध्ये 4,814 कोटी रुपयांची गुंतवणूक

Patil_p

पाकिस्तानच्या सैन्याला राजकीय आव्हान

Patil_p

हेलिकॉप्टर अपघातात बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती

Archana Banage