Tarun Bharat

इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या मुलाने मागितली हिंदूंची माफी

ऑनलाईन टीम / जेरुसलम : 

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे पुत्र यैर याने देवी दुर्गाच्या आक्षेपार्ह फोटो ट्विटप्रकरणी भारतीय हिंदूंची माफी मागितली आहे.

यैर याने देवी दुर्गाचा आक्षेपार्ह फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. भारतीय लोकांनी या ट्विटबद्दल जोरदार आक्षेप घेतला होता. त्यानंतर यैरने तात्काळ हा फोटो काढून टाकत हिंदूंची माफी मागितली आहे. यैर याने देवी दुर्गाच्या फोटोमध्ये दुर्गाच्या जागी लिएट बेन एरी यांचा चेहरा दाखवला होता. तसेच देवीच्या अनेक हातांचे मधले बोट उंचावलेले दर्शवण्यात आले होते.लिएट बेन एरी बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर चालू असणाऱ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील फिर्यादी आहेत.

यैर याने ट्विट करून भारतीयांची माफी मागितली आहे. ‘इस्रायलमधील एका राजकीय व्यक्‍तीवर टीका करण्यासाठी मी हे मीम विडंबनाच्या एका पेजवरून घेतले होते. हे मीम हिंदू धर्मातील दुर्गा देवतेशी संबंधित आहे, याची मला कल्पना नव्हती. भारतीयांच्या कॉमेंट्सवरून मला ते समजले. त्यानंतर मी लगेच ते ट्विट डिलिट केले. भारतीयांच्या भावना दुखावल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो’, असे यैर याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

Related Stories

आत्महत्येला परवानगी द्या, शेकडो मानसेवी डॉक्टरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Archana Banage

बस अभावी नागरिकांचे हाल

Rohit Salunke

लसीचे दुष्परिणाम

Patil_p

सदाभाऊंची शेवटच्या क्षणी माघार

datta jadhav

आज बाळासाहेब असते तर म्हणाले असते, नारायण…

Archana Banage

नवनीत राणांना तुरुंगात अमानवीय वागणूक, लोकसभा अध्यक्षांनी मागवला अहवाल

Archana Banage