Tarun Bharat

इस्रायल : 2 वर्षांत चौथ्यांदा निवडणूक होणार

Advertisements

बेंजामीन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळले : सार्वत्रिक अर्थसंकल्प मंजूर न झाल्याने आर्थिक संकटाची शक्यता

वृत्तसंस्था / जेरूसलेम

पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार इस्रायलमध्ये मंगळवारी कोसळले आहे. देशात पुढील वर्षी पुन्हा निवडणूक होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दोन वर्षांच्या कालावधीत इस्रायलचे नागरिक नव्या सरकारसाठी चौथ्यांदा मतदान करणार आहेत. मागील निवडणुकीतही कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने नेतान्याहू यांच्या लिकुड आणि संरक्षणमंत्री बेनी गँट्ज यांच्या ब्ल्यू अँड व्हाइट पार्टीने मे महिन्यात आघाडी सरकार स्थापन केले होते.

नेतान्याहू यांच्या सरकारवर मागील महिन्यापासूनच संकट घोंगावू लागले होते. नेतान्याहू देशापेक्षा अधिक लक्ष स्वतःवरील भ्रष्टाचाराचे आरोप दूर करण्यावर देत आहेत, असा आरोप आघाडीचे नेते गँट्ज यांनी केला होता. याचबरोबर आतापर्यंत इस्रायलमध्ये सार्वत्रिक अर्थसंकल्प मंजूर न झाल्याने आर्थिक संकट उभे राहू शकते. पुढील वर्षी 23 मार्च रोजी नव्याने निवडणूक घेतली जाणार असल्याचे वृत्त आहे.

सरकार कोसळल्यावर नेतान्याहू यांनी आघाडीतील सहकारी गँट्ज यांच्यावर निशाणा साधला आहे. ब्ल्यू अँड व्हाइट पार्टी आणि त्याच्या नेत्यांनी आमच्यादरम्यान झालेल्या कराराचे पालन केलेले नाही. वारंवार निवडणूक व्हावी, अशी कुठल्याच नागरिकाची इच्छा नाही. कोरोनामुळे यापूर्वीच अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत, आर्थिक संकट देखील आहे, तरीही निवडणूक घ्यावी लागणार असल्याचे नेतान्याहू म्हणाले.

इस्रायलमध्ये कोरोनाचे लसीकरण सुरू झाले आहे. स्वतः नेतान्याहू यांनी शनिवारी लस टोचून घेतली आहे. सद्यस्थितीत निवडणूक व्हावी अशी आमची इच्छा नाही. परंतु आमचा पक्ष निवडणुकीला घाबरत नाही, कारण माझ्या पक्षाचा विजय निश्चित असल्याचा दावाही नेतान्याहू यांनी केला आहे.

नेतान्याहू यांनी स्वतःच्या लाभासाठी देशाला मोठय़ा संकटात लोटले आहे. सद्यकाळात नेतान्याहू यांनी लोकांचे कल्याण आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी काम करणे अपेक्षित होते, असे उद्गार ब्ल्यू अँड व्हाइट पार्टीचे अध्यक्ष बेनी गेंट्ज यांनी काढले आहेत.

सत्तासंकट अपेक्षितच

7 महिन्यांपूर्वी नेतान्याहू आणि गँट्ज यांनी आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासूनच हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याचे जाणकार सांगत होते. स्वतः गँट्ज यांनी याला ‘आपत्कालीन आघाडी’ संबोधिले होते. मे महिन्यात दोन्ही पक्षांनी एका सामायिक कार्यक्रमाद्वारे सरकार स्थापन करण्यावर सहमती व्यक्त केली होती आणि याकरता एक करारही झाला होता. या कराराच्या अंतर्गत पहिले 18 महिने नेतान्याहू पंतप्रधानपद भूषविणार होते. पुढील 18 महिन्यांकरता गँट्ज पंतप्रधान होणार होते. पण, सरकार स्थापन झाल्यापासूनच दोन्ही पक्षांमधील मतभेद ठळकपणे समोर आले होते. निवडणुकीच्या विशिष्ट पद्धतीमुळे तेथे वारंवार राजकीय संकट निर्माण होते.

Related Stories

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पाक पंतप्रधानांना जामीन

Patil_p

शाहबाज शरीफ मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागणार

Patil_p

उणे 50 अंशांवर गोठलेले शहर

Patil_p

चीनशी युद्धाचा धोका, अमेरिका-ब्रिटन सजग

Patil_p

90 वर्षीय ताकिशिमा आहेत फिटनेस इंस्ट्रक्टर

Patil_p

कोरोना निर्बंधांपासून ब्रिटनला मिळाली मुक्ती

Patil_p
error: Content is protected !!