Tarun Bharat

इस्रोचा ‘व्योममित्र’ अंतराळाचे अंतरंग उलगडणार

Advertisements

गगनयान मोहिमेपूर्वी अंतराळात पोहोचणार : व्योममित्राचे जगासमोर सादरीकरण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

 भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनायान मोहिमेला निर्धारित वेळेत साकार करण्यासाठी इस्रोने कंबर कसली आहे. या मानवयुक्त अंतराळ उड्डाणासाठी 2022 च्या जानेवारी महिन्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. गगनयानच्या उड्डाणापूर्वी इस्रो ‘व्योममित्र’ला अंतराळात पाठविणार असून तेथे मानवी शरीरांच्या हालचालींचा अध्ययन त्याच्यामार्फत होणार आहे. हा ‘हाफ ह्युमनॉईड’ (मानवी) रोबो अंतराळातून इस्रोला स्वतःचे अहवाल पाठविणार आहे. इस्रोने बुधवारी व्योममित्र जगासमोर सादर करत त्याची वैशिष्टय़े मांडली आहेत. संस्कृत शब्द असणाऱया व्योममित्रचा अर्थ ‘अंतराळमित्र’ असा आहे.

व्योममित्र अंतराळात मानवी शरीराच्या हालचालींचे अध्ययन करणार असून त्यासंबंधीचा तपशील पाठविणार असल्याचे इस्रोचे वैज्ञानिक सॅम दयाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. व्योममित्र एक अत्यंत विशेष रोबो असून तो बोलू शकतो तसेच व्यक्तींची ओळख पटवू शकतो. हा रोबो अंतराळवीरांकडून होणाऱया हालचालींची नक्कल करू शकतो.

प्रश्नांना उत्तरे देणारा रोबो

लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देणारा हा रोबो इस्रोने विकसित केला आहे. व्योममित्र बुधवारी बेंगळूर शहरात सादर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात व्योममित्राने ‘हाय मी हाफ ह्युमनॉइडचा पहिला प्रोटोटाईप आहे’ असे म्हणत लोकांना अभिवादन केले आहे. या रोबोला पाय नसल्यानेच त्याला हाफ ह्युमनॉइड म्हटले जात असल्याचे दयाल यांनी सांगितले आहे.

महत्त्वाची भूमिका

हा रोबो केवळ समोरच्या तसेच बाजूच्या अंगाने वाकू शकतो. तसेच अंतराळात त्याच्याकडून काही चाचण्यांची पूर्तता होणार असून तो इस्रोच्या नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहणार आहे. गगनयानमधील अंतराळवीरांना सुखरुप परत भूमीवर आणण्याच्या दृष्टीने व्योममित्राची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

अंतराळवीरांची निवड

अंतराळ मोहिमेसाठी एकूण 12 पैकी पहिल्या 4 उमेदवारांची निवड झाली असून ते रशियात चालू महिन्याच्या अखेरीस प्रशिक्षण सुरू करतील. या उमेदवारांची ओळख गुप्त ठेवली जात आहे. पण हे सर्वजण वायुदलाचे वैमानिक असल्याचे समोर आले आहे. प्रशिक्षण कार्यक्रम नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होणार असून तो 15 महिन्यांपर्यंत चालणार आहे. या मोहिमेवर 10 हजार कोटी रुपये खर्च पेले जाणार आहेत.

अंतराळ स्थानकाचे लक्ष्य

डिसेंबर 2020 आणि जून 2021 मध्ये मानवरहित मोहिमांची पूर्तता केली जाणार आहे. त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम साकारली जाणार आहे. मानवी मोहिमांसाठी अंतराळात स्थानक निर्माण करण्याचे लक्ष्य आहे. भविष्यात लोकांच्या भल्यासाठी काम करण्याची इच्छा असल्याचे इस्रो अध्यक्षांनी म्हटले आहे.

ह्युमनॉइड म्हणजे काय?

ह्युमनॉईड हे माणसांप्रमाणे चालणारे तसेच हिंडणारे रोबो असतात, तसेच ते मानवी हावभाव जाणू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रोग्रामिंगद्वारे ह्युमनॉइड प्रश्नांना उत्तरेही देऊ शकतात. ह्युमनॉइडमध्ये दोन विशेष हिस्से असतात आणि तेच माणसांप्रमाणे व्यक्त होणे आणि चालण्यास फिरण्यास मदत करतात. सेंसर्स आणि ऍक्च्युएटर्स यात महत्त्वाचे योगदान देतात. सेंसरच्या मदतीने ह्युमनॉइड भोवतालचे वातावरण समजून घेतात. कॅमेरा, स्पीकर आणि मायक्रोफोन यासारखी उपकरणे सेंसर्सच्या मदतीने नियंत्रित होतात. ह्युमनॉइड या उपकरणांच्या मदतीने पाहणे, बोलणे आणि ऐकण्याचे काम करतात. ऍक्च्युएटर विशेष प्रकारची मोटर असते, जी ह्युमनॉइडला माणसाप्रमाणे चालणे आणि हातपायांचे संचालन करण्यास मदत करतात.

जगातील प्रख्यात ह्युमनॉइड : सोफिया, कोडोमोरॉइड, जिया जिया

Related Stories

पीएसीच्या तंबूत घुसला ट्रक; 2 जवानांना वीरमरण

datta jadhav

वाळवंटात खड्डय़ांमधील पाण्यावर अवलंबून लोक

Patil_p

पंजाबमध्ये 15 जूनपर्यंत वाढविले कोरोना निर्बंध; मात्र उद्यापासून काही प्रमाणात सूट

Rohan_P

सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास ‘शूट अ‍ॅट साईट’ची ऑर्डर?

Abhijeet Shinde

जम्मू-श्रीनगर महामार्गावर एकतर्फी वाहतूक

Patil_p

बैलूर येथे नवरात्रोत्सवाची उत्साहात सांगता

Patil_p
error: Content is protected !!