Tarun Bharat

इस्लामपुरात क्रिकेटच्या वादातून खून

Advertisements

प्रतिनिधी / इस्लामपूर

येथील विजयमाला आश्रमात राहून शिक्षण घेणाऱया इचलकरंजीच्या सतरा वर्षीय विद्यार्थ्याने येथील एका महाविद्यालयात एस.वाय.बी.ए.ला शिकणाऱया ओंकार दिलीप जाधव (20,रा.कार्वे, ता.कराड) याचा चाकूने भोकसून खून केल्याची घटना रविवारी सायंकाळनंतर घडली. क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. संशयित अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले.

तिरंगा चौकाजवळील पॉवर हाऊसनजीक हा आश्रम आहे. रविवारी सायंकाळी आश्रमाच्या मोकळय़ा जागेत मुले क्रिकेट खेळत होती. दरम्यान, मृत ओंकार व अल्पवयीन मुलात जोराने बॉल टाकण्याच्या कारणावरुन वादावादी व मारामारी झाली. अल्पवयीन मुलाने ‘थांब तुला आता जीवंत ठेवत नाही’, असे म्हणून आश्रमातील खोलीत जावून स्वतःच्या बॅगेतील चाकू आणला. त्या चाकूने ओंकार याच्या डाव्या बरगडीवर व डाव्या मांडीवर हल्ला चढवून गंभीर जखमी केले. त्याला तात्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये हलवले. दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

  पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे व पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी  जावून भेट दिली. अल्पवयीन संशयित हा इयत्ता 12 वी तर मृत हा एस.वाय.बी.एला एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. आश्रमामध्ये राहून शिक्षण घेणाऱया अल्पवयीनाने विद्यार्थी मित्राचाच खून केल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी मृत ओंकारची आई नंदा दिलीप जाधव (मूळ रा.कार्वे, सध्या तिरंगा चौक पॉवर हाऊस जवळ) यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ करीत आहेत.

Related Stories

Sangli; महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी व्हावी यासाठी विराट मोर्चाचे आयोजन

Abhijeet Khandekar

मिरजेत इलेक्ट्रॉनिक दुकानाचे गोडाऊन फोडणारे तीन चोरटे गजाआड

Abhijeet Shinde

घरोघरी गौरी-शंकरोबाचे पूजन

Abhijeet Shinde

सांगली : जाचक व चूकीची उपभोगकर्ता करप्रणाली रदद् करा

Abhijeet Shinde

सांगली : खटावमधील दारुबंदीसाठी आता विशेष महिला ग्रामसभा

Abhijeet Shinde

स्वाभिमानीची २१ वी ऊस परिषद १५ ऑक्टोबर रोजी – राजू शेट्टी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!